कीड व तण व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:40 AM2021-09-02T04:40:42+5:302021-09-02T04:40:42+5:30
गेल्या वर्षाप्रमाणे या पिकाला यंदाही चक्री भुंगा किडीचा प्रादुर्भाव झाला आहे. चक्री भुंगा ही कीड सध्याच्या पीकवाढीच्या सुरुवातीच्या अवस्थेत ...
गेल्या वर्षाप्रमाणे या पिकाला यंदाही चक्री भुंगा किडीचा प्रादुर्भाव झाला आहे. चक्री भुंगा ही कीड सध्याच्या पीकवाढीच्या सुरुवातीच्या अवस्थेत देठ, फांदी किंवा मुख्य खोडावर दोन समांतर खाचा करून त्यामध्ये अंडी घालते. यामुळे झाडाला वरपर्यंत अन्नपुरवठा बंद होऊन वरील भाग वाळून जातो. त्यावर शेतकऱ्यांनी वेळीच उपाययोजना करण्याचा सल्ला देण्यात आला.
या प्रात्यक्षिकासाठी त्यांना कृषी महाविद्यालय रिसोड येथील समन्वयक आर. एस. डवरे कीटक शास्त्रज्ञ, प्राचार्य डॉ. ए. एम. अप्तुरकर, कार्यक्रम समन्वयक रावे. प्रा. डी. डी. मसूडकर, कार्यक्रम अधिकारी प्रा. एन. ए. कंकाळ, प्रा. आर.वाय. सरनाईक, विस्तार शिक्षण प्रा. एस. बी. खोडके, कृषीशास्त्र विभाग प्रा. एस. जे. जाधव, वनस्पती विकृतीशास्त्र विभाग प्रा. व्ही. एस. बोडखे व कीटकशास्त्र विभाग प्रा. जी. एस. हरणे यांचे मार्गदर्शन लाभले.