वाडेगाव येथील हळदी-कुंकु कार्यक्रमात महिलांना मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 04:18 AM2021-01-23T04:18:59+5:302021-01-23T04:18:59+5:30
वाडेगाव : येथे कृषी माहिती तंत्रज्ञान केंद्र, जिजाऊ ब्युटीपार्लर, जिजाऊ शिवण कला केंद्राच्या संयुक्त विद्यमाने हळदी-कुंकवाचा कार्यक्रम घेण्यात आला. ...
वाडेगाव : येथे कृषी माहिती तंत्रज्ञान केंद्र, जिजाऊ ब्युटीपार्लर, जिजाऊ शिवण कला केंद्राच्या संयुक्त विद्यमाने हळदी-कुंकवाचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी महिलांना विविध योजनांबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर ग्रामपंचायत निवडणुकीत नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी किर्ती सतीश पाटील, प्रज्ञा राजकुमार अवचार, मंदा सुनील पाटील, शीतल सदानंद पाटील, अर्चना प्रकाश मसने, रूपाली शहाणे, डॉ. चांद, अनिशा बी शे. फिरोज यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाला महिलांचा उर्त्स्फूत प्रतिसाद मिळाला. यावेळी जवळपास ५०० महिलांची उपस्थिती होती. कार्यक्रमात वंदना सरप, भाग्यश्री चिंचोळकर, लताताई वाडकर, पद्माताई सरप, चंदाताई सरप, अनुराधा सरप, संगीता तायडे, किरण बोराडे, वंदना ताकवाले, स्वाती वाढोकर, अश्विनी ताकवले, पुष्पा वाढोकार, वर्षा घाटोळ, प्रांजली सरप, सोनाली बोरसे यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. (फोटो)