शिक्षक परिषदेच्यावतीने मार्गदर्शन कार्यशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:14 AM2021-07-20T04:14:45+5:302021-07-20T04:14:45+5:30
मागील सत्रात आवश्यक ते अध्ययन अनुभव विद्यार्थ्यांना देता आले नाहीत, त्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या वतीने यावर्षी शैक्षणिक सत्राच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांना ...
मागील सत्रात आवश्यक ते अध्ययन अनुभव विद्यार्थ्यांना देता आले नाहीत, त्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या वतीने यावर्षी शैक्षणिक सत्राच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांना मागील वर्षाच्या अभ्यासक्रमाची चालू वर्षाच्या अभ्याक्रमाशी सांगड घालता यावी, यासाठी महत्त्वपूर्ण अशा ब्रीज कोर्स (सेतु अभ्यासक्रम) ची निर्मिती केली आहे. ब्रीज कोर्स विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असून, तो राबवितांना शिक्षकांना येणाऱ्या अडचणींचे निरसन करण्यासाठी व त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी ब्रीज कोर्सचे राज्यस्तरीय निर्मिती सदस्य तथा जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था अकोला येथील विषय सहायक डॉ. जितेंद्र काठोळे यांच्या प्रमुख मार्गदर्शनात मूर्तिजापूर तालुक्यातील शिक्षकांसाठी ऑनलाईन कार्यशाळेचे आयोजन महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग, मूर्तिजापूरच्यावतीने करण्यात आले. या कार्यशाळेत डॉ. काठोळे यांनी शिक्षकांना मार्गदर्शन करून समस्यांचे निराकरण केले. जिल्हाध्यक्ष प्रकाश चतरकर व जिल्हा कार्यवाह सचिन काठोळे यांच्या संकल्पनेतून सातही तालुक्यांत या कार्यशाळेचे आयोजन करण्यात येणार आहे.
यासाठी धर्मेंद्र चव्हाण, किशोर चतरकर, रामदास भोपत, समाधान उमप, अनंत मिसाळ, एहसान पठाण, सुनीता कोथळकर, किरण गावंडे, रूपेश सूर्यवंशी, अमोल कावरे अमित सुरपाटणे, सतीश वसू, किशोर बोंडे, जानराव इंगळे, प्रमोद तायडे, अब्दुल रशीद अब्दुल लतिफ, मनीष कट्यारमल, प्रमोद तेलमोरे, दिनेश येवले, अनुप दळवी, प्रकाश पानझाडे लाला तवाडे, नीलेश भारसाकळे, कुमुद अंबाळकर, कल्पना येवले, प्रतिभा तळोकार, प्रांजली ठाकरे, शुभांगी गुल्हाने, शुभांगिनी पवार, रियाज अहमद अब्दुल खलील, सचिन जोशी, अतुल गावंडे, अतुल पाथरकार, गणेश धाये, अविनाश काठोळे, नितीन वाघमारे, अविनाश कडू, मंगेश सांगळे, अनिल नाचवणार, अभिजित देशमुख, आदी परिश्रम घेत आहेत.