माना येथे कार्यशाळेत महिलांना मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:34 AM2021-03-13T04:34:59+5:302021-03-13T04:34:59+5:30
जागतिक महिला दिन ते जागतिक पर्यावरण दिन या दरम्यान चालणाऱ्या अभय अभियानादरम्यान महिलांच्या शिक्षण संस्था उभ्या करणे, त्यांना वित्तीय ...
जागतिक महिला दिन ते जागतिक पर्यावरण दिन या दरम्यान चालणाऱ्या अभय अभियानादरम्यान महिलांच्या शिक्षण संस्था उभ्या करणे, त्यांना वित्तीय सहायता देणे, त्यांची उपजीविकेचे साधन उपलब्ध करून देणे, महिलांना व महिलांच्या मुला-मुलींना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, समूहातील महिलांना स्वच्छता, आरोग्य, पोषण, तसेच त्यांच्या सर्वांगीण विकास अशा अनेक प्रकारचे उद्दिष्ट या अभियानादरम्यान पूर्ण केले जाणार आहेत. याबाबत कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी अंमलबजावणी समितीचे अध्यक्ष, सचिव आणि सदस्य उपस्थित होते, तसेच माना येथील ग्रामसेवक पंडित, जामठी येथील ग्रामसेवक कुरुमकर उपस्थित होते, तसेच प्रभागातील संगीता माहुरे, सुचिता मेटांगे, कांचन तायडे, मनीषा धारपवार, सविता राऊत, संगीता वावगे व गावातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यशाळेत माना प्रभागाचे प्रभाग समन्वयक इंदुरकर यांनी मार्गदर्शन केले. तालुका व्यवस्थापक वर्षा पुंड यांनी आभार मानले. (फोटो)