विधान भवनावर आयोजित हल्लाबोल मोर्चात शेतकर्‍यांसह जनतेने सहभागी व्हावे - गुलाबराव गावंडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2017 12:06 AM2017-12-11T00:06:49+5:302017-12-11T00:31:32+5:30

अकोला : शेतकर्‍यांच्या मुळावर उठलेल्या राज्य सरकारच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या नेतृत्वात १२ डिसेंबर रोजी नागपूर विधान भवनावर आयोजित हल्लाबोल मोर्चात अकोला जिल्हय़ासह पश्‍चिम विदर्भातील लाखो शेतकर्‍यांसह जनतेने सहभागी होण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे यांनी केले आहे.

Gulabrao Gavande, to join the masses in the attackball march organized on the Legislative Assembly | विधान भवनावर आयोजित हल्लाबोल मोर्चात शेतकर्‍यांसह जनतेने सहभागी व्हावे - गुलाबराव गावंडे

विधान भवनावर आयोजित हल्लाबोल मोर्चात शेतकर्‍यांसह जनतेने सहभागी व्हावे - गुलाबराव गावंडे

googlenewsNext
ठळक मुद्देप्रदेश उपाध्यक्ष गुलाबराव गावंडे यांचे आवाहन१२ डिसेंबर रोजी धडकणार मोर्चा

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : शेतकर्‍यांच्या मुळावर उठलेल्या राज्य सरकारच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या नेतृत्वात १२ डिसेंबर रोजी नागपूर विधान भवनावर आयोजित हल्लाबोल मोर्चात अकोला जिल्हय़ासह पश्‍चिम विदर्भातील लाखो शेतकर्‍यांसह जनतेने सहभागी होण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे यांनी केले आहे.
राज्यात भाजपाचे सरकार येताच शेतकरी देशोधडीला लागला असून, त्यांना आत्महत्येस प्रवृत्त करण्याचे काम राज्य सरकार करीत आहे. या सरकारच्या विरोधात शेतकर्‍यांमध्ये प्रचंड आक्रोश आहे. या सर्व अडचणी आणि शेतकर्‍यांच्या विविध समस्या तसेच प्रश्नांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे १ डिसेंबरपासून यवतमाळ येथून हल्लाबोल आंदोलन सुरू करण्यात आले आहे. या आंदोलनामध्ये खा. सुप्रिया सुळे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे, विरोधी पक्षनेते धनंजय मुंढे यांच्यासह माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व नेते सहभागी झाले आहेत. शेतकर्‍यांच्या मनातील खदखद बाहेर काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने या हल्लाबोल आंदोलनाच्या माध्यमातून शेतकर्‍यांना व्यासपीठ निर्माण करून दिले असून, यामध्ये शेतकर्‍यांचा प्रचंड प्रतिसाद लाभत आहे. या आंदोलनात पहिल्या दिवसापासून विदर्भातील शेतकर्‍यांचे नेते तथा सावकारविरोधी कायद्याचे प्रणेते माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे यांनी पदयात्रेत चांगलाच जोश निर्माण केला असून, शेतकर्‍यांमध्ये आत्मविश्‍वास निर्माण करण्याचे काम सुरू केले आहे. शेतकर्‍यांना योग्यरीत्या मार्गदर्शन करीत त्यांनी सभा गाजविणे सुरू केले आहे. शेतकर्‍यांना न्याय मिळावे, त्यांचे प्रश्न या सरकारच्या लक्षात आणून देण्यासाठी शरद पवार स्वत: या हल्लाबोल आंदोलनात सहभागी होणार असून, या मोर्चात पश्‍चिम विदर्भातील तमाम शेतकरी व कार्यकर्त्यांनी लाखोंच्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन प्रदेश उपाध्यक्ष गुलाबराव गावंडे यांनी केले आहे.

Web Title: Gulabrao Gavande, to join the masses in the attackball march organized on the Legislative Assembly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.