बिनधास्त सुरू आहे रेल्वे स्थानकाच्या फलाटांवर गुटखा विक्री!

By admin | Published: May 1, 2016 01:13 AM2016-05-01T01:13:39+5:302016-05-01T01:13:39+5:30

अकोला रेल्वे स्थानकावरील प्रकार; महिलांच्या माध्यमातून होतेय गुटखा विक्री

Guntak sale on railway station platforms is underway! | बिनधास्त सुरू आहे रेल्वे स्थानकाच्या फलाटांवर गुटखा विक्री!

बिनधास्त सुरू आहे रेल्वे स्थानकाच्या फलाटांवर गुटखा विक्री!

Next

अकोला: गुटखा विक्रीवर बंदी असली तरी, अकोला रेल्वेस्थानकाच्या फलाटांवर बिनधास्तपणे गुटखा विक्री सुरू असल्याचे दिसून येत आहे. उन्हाळय़ाच्या सुट्यांमुळे रेल्वेला गर्दी वाढली असून, गुटखा व्यावसायिक महिलांच्या माध्यमातून गुटखा विक्री करीत असल्याचे वास्तव शनिवारी ह्यलोकमतह्णने केलेल्या स्टिंग ऑपरेशन दरम्यान दिसून आले. नोव्हेंबर २0१३ मध्ये गुटखा, सुगंधी सुपारी, मावा यांसह तंबाखुजन्य पदार्थाच्या विक्रीवर राज्य शासनाने बंदी घातली. ह्यकुठल्याही ठिकाणीह्ण विक्री होत असल्यास, संबंधितांवर फौजदारी कारवाई करण्याचेही आदेश दिले. मात्र अकोला रेल्वे स्थानकावर त्या निर्णयाला हरताळ फासला जात असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. गर्दीच्या या हंगामात कमाई करण्याचा नवीन फंडा गुटखा व्यावसायिकांनी शोधून काढला आहे. रेल्वे फलाटांवर महिलांच्या माध्यमातून गुटखा विक्री केली जात असल्याची बाब शनिवारी ह्यलोकमतह्णचमूने केलेल्या स्टिंग ऑपरेशनदरम्यान आढळून आली. अकोला रेल्वे पोलिसांनी आजतागायत अनेकदा गुटख्याचा अवैध साठा जप्त करून अनेकांना जेरबंद केले. मात्र पोलीसांच्या डोळादेखत महिला रेल्वे फलाटांवर गुटखा विक्री करीत असल्याचे दिसून येत आहे.

Web Title: Guntak sale on railway station platforms is underway!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.