पालकमंत्र्यांनी केले जलपुजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2017 02:35 PM2017-08-16T14:35:44+5:302017-08-16T14:37:50+5:30
अकोला : शासनाच्या महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या जलयुक्त शिवार अभियानातंर्गत जिल्हयात मोठया प्रमाणात कामे झाले असून जिल्हयात २१६ गावे शंभर टक्के जलयुक्त झाली आहेत.
दिनांक १५ आॅगस्ट २०१७ रोजी पालकमंत्री तथा गृहराज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांचे हस्ते अकोला तालुक्यातील आपोती बु. येथे लोणार नदीवर खोदलेला डोह खोदणे या कामात साठविलेल्या जलाचे जलपुजन करण्यात आले. यावेळी उपजिल्हाधिकारी (रोहयो) अभय मोहीते, जिल्हा परिषदेचे लघुसिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता अरविंद देशमुख, उपविभागीय कषी अधिकारी अजय कुळकणी, आपोती बु.चे सरपंच वंदनाताई तराळे यांची प्रमुख उपस्थस्थिती होती.
आपोती येथील लोणार नाल्यावर लघुसिंचन विभागातर्फे ४५० मीटर लांबी, १२ मी रूंदी व सरासरी २ मी खोलीचे डोह खोद काम करण्यात आले आहे. या डोहामध्ये ११ टिसीएम पाणीसाठा जमा झाला आहे. यामुळे सुमारे ७ हेक्टर जमिनीवर सिंचन होणार असून या कामावर ५ लाख ३५ हजार खर्च झालाआहे. या प्रकारचा डोह आपोती बु. क्रं २ येथे करण्यात आला असून, यामुळे सुध्दा ७ हेक्टर जमिनीवर सिंचन होणार आहे. यामुळे या पाणी टंचाईच्या परिस्थीतीत पाणीसाठा या भागात निर्माण झाला आहे. हे जलयुक्त शिवार कामाचे फलीत असल्याचे प्रतिक्रीया पालकमंत्री यांनी व्यक्त केले.
यावेळी तहसिलदार राजेश हांडे लघुसिंचन विभागाचे उपअभियंता मंगेश काळे , शाखा अभियंता शाम वाकपांजर तालुका कृषी अधिकारी नरेंद्र शास्त्रीसह ग्रामस्थ उपस्थित होते.