‘गुरुदेव सेवा मंडळाचा कार्यकर्ता सेवाभिमुख असावा’

By admin | Published: December 14, 2015 02:42 AM2015-12-14T02:42:00+5:302015-12-14T02:42:00+5:30

‘राष्ट्रसंतांना अपेक्षित गुरुदेव सेवक’ परिसंवादातील सूर.

'Gurudev Seva Mandal worker should be service oriented' | ‘गुरुदेव सेवा मंडळाचा कार्यकर्ता सेवाभिमुख असावा’

‘गुरुदेव सेवा मंडळाचा कार्यकर्ता सेवाभिमुख असावा’

Next

अकोला: वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे विचार साहित्य समाजातील प्रत्येक घटकापर्यंंत पोहोचविण्यात आपण कुठवर यशस्वी झालो आहोत, तसेच राष्ट्रसंतांना अपेक्षित असलेला ह्यगुरुदेव सेवकह्ण कसा असावा, या विषयावर विचारविर्मश करण्याच्या उद्देशाने रविवारी सकाळी आयोजित करण्यात आलेल्या परिसंवादात गुरुदेव सेवा मंडळाचा कार्यकर्ता हा पूर्णत: सेवाभिमुख असावा, असा एकत्रित सूर उमटला.
राष्ट्रसंत विचार साहित्य संमेलनाच्या तिसर्‍या दिवशी सकाळच्या सत्रात आयोजित परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी नागपूरचे ज्येष्ठ प्रचारक प्रा.डॉ. भास्करराव विघे, प्रमुख मार्गदर्शक म्हणून नांदुर्‍याचे श्रीगुरुदेव सेवक आचार्य हरिभाऊ वेरूळकर गुरुजी, तर प्रमुख अतिथी म्हणून शेगाव येथील राष्ट्रीय कीर्तनकार सुशील वानवे, पीएसआय रणजितसिंग ठाकूर उपस्थित होते. आधाराशिवाय जीवनाला धार मिळत नाही, अपेक्षित गुरुदेव सेवक कसा असावा, यावर बोलताना आचार्य वेरूळकर म्हणाले, की गुरुदेव सेवा मंडळाची उपासना ही व्यक्तिनिष्ठ नसून, तत्त्वनिष्ठ आहे. व्यक्तिगत श्रद्धेला सामाजिक रूप देण्यास प्रारंभ झाला, की संप्रदाय निर्माण होतो. आज जितके संप्रदाय अस्तित्वात आहेत, ते सर्व व्यक्तिनिष्ठ असल्याने संकुचित झाले आहेत. गुरुदेव सेवा मंडळ हा पंथ वा संप्रदाय नाही, हे एक वैचारिक सेवा मंडळ आहे. गुरुदेव सेवकांनी कुठल्याही बाबीवर टीका न करता कृतीतून प्रचारकार्यात लीन रहावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
ह्यउस फुल की पंखुडिया है, जो अलग, अलग ढंगसे प्रचार कर रही हैह्ण फुलाच्या पाकळय़ांची उपमा देत संमेलनाध्यक्ष प्रा. डॉ. भास्करराव विघे यांनी गुरुदेव सेवकांचे कार्य स्पष्ट केले. अंधारात प्रकाश तेवत ठेवणार्‍या पणतीप्रमाणे गुरुदेव सेवकांचे कार्य असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: 'Gurudev Seva Mandal worker should be service oriented'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.