गुरूजी आणि महिलाही भ्रष्टाचारात आघाडीवर!

By admin | Published: November 14, 2014 11:15 PM2014-11-14T23:15:52+5:302014-11-14T23:15:52+5:30

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्यावतीने २0१३ साली ४४८ गुन्हे, तर नोहेंबर २0१४ पर्यंत तब्बल ११३९ गुन्हे.

Guruji and women are leading corruption! | गुरूजी आणि महिलाही भ्रष्टाचारात आघाडीवर!

गुरूजी आणि महिलाही भ्रष्टाचारात आघाडीवर!

Next

खामगाव (बुलडाणा): लाचखोर लोकसेवकांवर कारवाईचे प्रमाण यावर्षी दुपटीने वाढले असून, भ्रष्ट लोकसेवकांमध्ये महिला कर्मचार्‍यांसह शिक्षकही मागे नसल्याचे दिसून येते. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्यावतीने २0१३ साली ४४८ गुन्हे दाखल करण्या त आले होते. यावर्षी, १ जानेवारी ते १३ नोव्हेंबर २0१४ या कालावधीत तब्बल ११३९ आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गतवर्षीच्या तुलनेत कारवाया दुपटीने वाढल्या असून, विशेष म्हणजे विद्यार्थी घडविण्याची जबाबदारी असलेले शिक्षकही भ्रष्टाचारात मागे नसल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. शिक्षण क्षेत्राशी निगडित असलेल्या २८ जणांना या काळात लाच घे ताना रंगेहाथ पकडण्यात आले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात महिलाही अडकल्या असून, यात विदर्भातील १६ महिलांचा समावेश आहे. *विदर्भातील १६ महिलांचा समोवश यावर्षी विदर्भात १६ महिला अधिकारी, कर्मचारी लाचलुचपत प्रतबंधक विभागाच्या जाळ्यात अडकल्या. यात महिला बाल कल्याण विभागाच्या दोन अधिकार्‍यांचा समावेश आहे. तीन भूमापन अधिकारी, तसेच तलाठी, मुख्याध्या िपका आणि शाळा सचिव पदावरील प्रत्येकी दोन महिलांचा, तर ग्रामसेविका, सर पंच, गटशिक्षणाधिकारी, महसूल अधिकारी आणि स्थापत्य अभियांत्रिकी क्षेत्रा तील प्रत्येकी एका महिलेवर कारवाई करण्यात आली आहे. *वर्ग ३ चे अधिकारी सर्वाधिक भ्रष्ट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने १ जानेवारी ते १३ नोव्हेंबर २0१४ या काळात राबविण्यात आलेल्या मोहिमेत वर्ग ३ चे सर्वाधिक ८५५ अधिकारी, कर्मचारी जाळ्यात अडकले.

Web Title: Guruji and women are leading corruption!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.