ऑनलाइन विद्यार्थी हजेरीवरून गुरूजी संतप्त!

By admin | Published: January 14, 2017 12:38 AM2017-01-14T00:38:50+5:302017-01-14T00:38:50+5:30

पायाभूत सुविधा उपलब्ध करण्याची शिक्षक संघटनांची मागणी.

Guruji angry with online student attendance! | ऑनलाइन विद्यार्थी हजेरीवरून गुरूजी संतप्त!

ऑनलाइन विद्यार्थी हजेरीवरून गुरूजी संतप्त!

Next

अकोला, दि. १- शासनाने विद्यार्थ्यांची ऑनलाइन हजेरी भरावी. असा निर्णय घेतला. परंतु शिक्षक, मुख्याध्यापकांना ऑनलाइन हजेरी भरण्यासंदर्भात पायाभुत सुविधा उपलब्ध करून दिल्या नाहीत. त्या द्याव्यात अशी मागणी अकोला जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण क्षेत्रातील विविध संघटना समन्वय समितीने केली.
शुक्रवारी सर्व शिक्षक, मुख्याध्यापक संघटनेच्या वतीने माध्यमिक उपशिक्षणाधिकारी दिनेश तरोळे यांना निवेदन देण्यात आले. निवेदनामध्ये शासनाने सेल्फी आदेशाला स्थगिती दिली असली तरी हा आदेश रद्द केलेला नाही. तसेच शाळांमधुन हजेरी नियमित इंटरनेटद्वारे ऑनलाइन पाठविण्याबाबतचा अध्यादेश काढला. परंतु यासाठी लागणारी नेट सुविधा, विद्युत पुरवठा, इंटरनेट सुविधा, शिक्षकांकरीता टॅब(लॅपटॉप), शाळांना पायाभुत सुविधा मात्र उपलब्ध करून दिल्या नाहीत. नेटद्वारे विद्यार्थ्यांची हजेरी घेण्यास शिक्षकांची हरकत नाही. परंतु त्यासाठी पायाभुत सुविधा शासनाने उपलब्ध करून द्याव्यात अशी आमची मागणी आहे. शिक्षणाधिकार्‍यांना निवेदन देणार्‍या शिष्टमंडळात मुख्याध्यापक संघाचे विदर्भ अध्यक्ष शत्रुघ्न बिरकडे, सचिव बळीराम झामरे, शहराध्यक्ष गजानन चौधरी, प्रेमकुमार सानप, राजेश पाथोडे, सोपान ढाकुलकर, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष विजय ठोकळ, प्रवीण लाजुरकर, दादा वंजारे, जयवंत हरणे, विज्युक्टाचे अध्यक्ष प्रा. अविनाश बोर्डे, काँग्रेस शिक्षक आघाडीचे विभागीय अध्यक्ष प्रकाश तायडे, अरूण दातकर, विकास सावरकर, शोएब अली, रामेश्‍वर धर्मे, दीपक बोचरे, नितीन गायकवाड, सुयोग खडसे, विजय टाले, सुरेश सिरसाट, प्रकाश चव्हाण, संजय साबळे, विलास खुमकर, रमेश ठाकरे, अशोक कथलकर आदींचा समावेश होता.

Web Title: Guruji angry with online student attendance!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.