तासिका तत्त्वावरील गुरूजी मजुरीवर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 04:24 AM2021-09-07T04:24:25+5:302021-09-07T04:24:25+5:30
किती दिवस जगायचे असे? राज्यात १७-१८ हजार सहायक प्राध्यापकांचे जागा रिक्त आहेत. तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांच्या नियुक्त्याही रखडल्या आहे. तासिका ...
किती दिवस जगायचे असे?
राज्यात १७-१८ हजार सहायक प्राध्यापकांचे जागा रिक्त आहेत. तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांच्या नियुक्त्याही रखडल्या आहे. तासिका दर वाढवून देण्याबाबत शासनाने पत्र काढले, परंतु अद्याप दर वाढविले नाहीत. आरक्षणाचाही मुद्दा असल्याने, तासिका तत्त्वावर काम करणाऱ्या प्राध्यापकांना जीवन कसे जगावे, असा प्रश्न सतावत आहे. यातून शासनाने मार्ग काढण्याची अपेक्षा आहे.
-प्रा.डॉ.उमेश घोडेस्वार
शासन प्राध्यापक भरतीबाबत अत्यंत उदासीन आहे. हजारो जागा रिक्त असतानाही शासनाकडून पदभरती होत नाही. तासिका तत्त्वावर काम करणाऱ्या प्राध्यापकांनी मानधनही कमी मिळते. त्यामुळे अनेकांना शेतमजुरी करावी लागत आहे. कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा भागवावा, असा प्रश्न सतावत आहे.
- प्रा.देवेंद्रसिंग सोळंके, सेट-नेट बेरोजगारांची समस्या वेगळीच
सेट-नेट झालेले शेकडो उच्च शिक्षितांची समस्याही गंभीर बनली आहे. उच्च शिक्षितांची बेरोजगारी वाढत आहे. त्यांची नियुक्ती किंवा रोजगार उपलब्ध केला नाही, तर त्यांचे वय वाढेल. त्यांची कौशल्यशक्ती संपत आहे. नेट-सेट, पीएच.डी, एमफील करण्यासाठी जीवनातील ७-८ वर्षे खर्ची घालावी लागतात. त्यानंतरही नोकरी मिळत नाही, ही शोकांतिका आहे. नंतर नोकरी मिळाली, तरीही ती केवळ १२-१५ वर्षेच करावी लागते. कारण वय वाढलेले असते.
यासाेबतच प्राध्यापक भरतीसाठी मोठ्या प्रमाणात डोनेशन मागितल्या जाते. एवढा पैसा आणावा तरी कुठून, त्यामुळे प्राध्यापक संघटनांकडून भरती प्रक्रियाही आयोगामार्फत करावी. सहायक प्राध्यापकांनी प्रति दिवस दीड हजार रुपये मानधन द्यावे, तरच त्यांची आर्थिक बाजू मजबूत होईल.
१० वर्षांपासून लटकला प्रश्न
गत दहा वर्षांपासून सहायक प्राध्यापकांची भरती प्रक्रिया लटकली आहे. प्राध्यापकांच्या संघटनांनी यासाठी सातत्याने आंदोलने केली, परंतु शासनाने त्याकडे लक्ष दिले नाही. सहायक प्राध्यापकांच्या रिक्त जागांचा अनुशेष वाढत आहे. राज्यातील १३ हजारांवर सहायक प्राध्यापकांची पदे रिक्त आहेत. आंदोलने केल्यावर संघटनांना केवळ भरतीचे आश्वासन दिले जाते, परंतु पुढे काहीच केल्या जात नाही. तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांची नियुक्ती तासिका दरात वाढ आदी प्रश्न प्रलंबितच आहेत.