अकोटात आज गुरुमाउलींचा जन्मोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 04:19 AM2021-03-16T04:19:37+5:302021-03-16T04:19:37+5:30
अकोट: वारकरी सांप्रदायाचे गुरुमाउली संत वासुदेव महाराजांचा १०४वा जन्मोत्सव मंगळवार, दि.१६ मार्च रोजी श्रीक्षेत्र श्रद्धासागर येथे होत आहे. कोविड ...
अकोट: वारकरी सांप्रदायाचे गुरुमाउली संत वासुदेव महाराजांचा १०४वा जन्मोत्सव मंगळवार, दि.१६ मार्च रोजी श्रीक्षेत्र श्रद्धासागर येथे होत आहे.
कोविड १९चा संसर्ग होऊ नये, यासाठीचे शासनाचे निर्देशाचे तंतोतंत पालन करण्यात येणार आहे. भाविकांच्या सुविधेसाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून भक्ती सोहळ्याचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. त्यामुळे भाविकांनी श्रद्धासागर येथे गर्दी न करता, जन्मोत्सव सोहळा घरी राहून बघावा, गुरुमाउलींचे पुण्यस्मरण करावे, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष हभप वासुदेवराव महल्ले यांनी केले आहे.
श्रद्धासागर येथे मंगळवारी संत वासुदेव महाराज यांचा १०४वा जन्मोत्सवाचा प्रारंभ पहाटे ५.३० वाजता श्री गुरूंचा महाभिषेकाने होणार आहे. गुरूनिवास मंदिर येथे सकाळी ७ वाजता पादुका व विणा पूजन व तद्नंतर श्रद्धासागर येथे सकाळी ९ ते ११ वाजेपर्यंत हभप श्रीहरी महाराज सोनेकर यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे. महाप्रसादाने या भक्ती सोहळ्याची सांगता पार पडेल. भाविकांनी श्री गुरूंचे दर्शन ऑनलाइन पद्धतीने घेता येणार आहे. दि. ९ ते १६ मार्चदरम्यान गुरुमाउलींचा जयंती महोत्सव भक्तिमय वातावरणात पार पडला. हभप अंबादास महाराज यांचे मार्गदर्शनाखाली अखंड हरिनाम, श्री ज्ञानेश्वरी पारायण, प्रवचन, डॉ.गोपाल महाराज झामरेकृत श्री ज्ञानेश्वरी भावकथा निरुपण व कीर्तनादी कार्यक्रम अगदी मोजक्याच भाविकांचे उपस्थितीत पार पडले. जयंती महोत्सवातील विविध कार्यक्रम प्रवचन, ज्ञानेश्वरी भावकथा व हरिकीर्तनाचे युट्युबद्वारा थेट प्रक्षेपण करण्यात आले असून, राज्यभरातील हजारो भाविक श्रवणाचा लाभ घेतला आहे, अशी माहिती संस्थेचे विश्वस्त नंदकिशोर हिंगणकर यांनी दिली. (गुरुमाउलींचा फोटो)