एकात्मतेचा मंत्र देणारे गुरुनानकदेव
By Admin | Published: November 6, 2014 12:53 AM2014-11-06T00:53:51+5:302014-11-06T00:53:51+5:30
आज गुरुनानक जयंती; अकोल्यातील गुरुद्वारात धार्मिक कार्यक्रम.
अकोला : शीख धर्माचे संस्थापक गुरुनानकदेव यांची जयंती म्हणजे शीख बांधवांची दिवाळीच. 'कोणी हिंदू नाही, कोणी मुसलमान नाही, सर्वजण एकाच परमेश्वराची लेकरे आहेत' अशी शिकवण देणार्या गुरुनानक यांचा जन्मोत्सव शीख बांधवांच्या दृष्टीने अतिशय पवित्र दिवस.
पंजाबमधील तळवंडी या खेड्यात मेहता कालिमान दास व त्रिस्ता यांच्या पोटी जन्मलेल्या गुरुनानकदेवांनी बालपणापासूनच अध्यात्माचा अंगीकार केला. संसाराचा त्याग करून त्यांनी एकांतवास पत्करला व साधना करून लोकांना खरा धर्म सांगितला. गुरुनानक हे स्वत: उत्तम कवी होते. त्यांनी अनेक पदांची रचना केली. ह्यगुरुग्रंथसाहिबह्ण हा शिखांचा पवित्र ग्रंथ. या ग्रंथात नानकदेवांच्या रचना समाविष्ट आहेत. या ग्रंथांचा प्रारंभच ह्य ओं सतिनामु करता पुरखु निरभउ, निखैरु अकाल, मूरती अजूनी सैभं गुरूप्रसादीह्ण या नानकांच्या मूलमंत्रानेच गुरुग्रंथांचा प्रारंभ होतो. गुरुनानक यांच्या काव्यातील ह्यजपजीह्ण ही काव्यरचना प्रसिद्ध आहे. ती सर्वश्रेष्ठ मानली जाते.
शीख धर्माचे आद्य गुरू असलेल्या गुरुनानक यांची जयंती शीख बांधव मोठय़ा भक्तीभावाने व पारंपरिक पद्धतीने साजरी करतात.