गुटखा माफियांच्या मुसक्या आवळल्या!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2017 11:03 PM2017-10-03T23:03:37+5:302017-10-03T23:04:26+5:30
अकोला : पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांच्या विशेष पोलीस पथकाचे प्रमुख हर्षराज अळसपुरे यांनी जुगार अड्डय़ांवर कारवाईचा धडाका लावल्यानंतर मंगळवारी रात्री जुना भाजी बाजारातील गुटखा माफियांच्या गोदामांवर छापामारी करून तब्बल ६५ लाख रुपयांचा प्रतिबंधित गुटखा व सुगंधित तंबाखू जप्त केला. विशेष पोलीस पथकाच्या कारवाईमुळे शहरातील गुटखा माफियांचे धाबे दणाणले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क

जुना भाजी बाजारात मोठय़ा प्रमाणात प्रतिबंधित गुटख्याचा साठा दडवून ठेवल्याची माहिती पोलीस अधीक्षकांच्या विशेष पोलीस पथकाचे प्रमुख व सहायक पोलीस निरीक्षक हर्षराज अळसपुरे यांना मिळाली. त्यांनी रात्री जुना भाजी बाजार परिसरा तील चंद्रनारायण लालचंद अग्रवाल (५१ रा. जवाहर नगर) याच्या भगवती सुपारी दुकानावर, रजपूतपुर्यातील घनश्याम सी ताराम अग्रवाल (५८) याच्या जगदंबा सुपारी स्टोअर्स, चमण सीताराम अग्रवाल (५२ रा. रजपूतपुरा) याच्या अंबिका पान मसाला दुकान, जवाहर नगरातील नितीन लालचंद अग्रवाल (३५) याच्या भगवती पान मसाला दुकान आणि एमआयडीसी क्रमांक-३ मधील विजय रतनलाल गुरबानी याच्या गोदामामधून मोठय़ा प्रमाणात प्रतिबंधित गुटखा, सुगंधित तंबाखू, सुपारीची पाकिटे मिळून आली. पोलिसांनी जप्त केलेल्या गुटख्याची किंम त ६५ लाख रुपये आहे. या सर्व गुटखा माफियांविरुद्ध रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. विशेष पोलीस पथकाने केलेल्या कारवाईमुळे शहरातील इतरही गुटखा माफियांचे धाबे दणाणले आहे. शहरातील एमआयडीसी, सिंधी कॅम्प, भाजी बाजारामध्ये दररोज लाखो रुपयांचा गुटखा उतरत असल्याची माहिती आहे. या ठिकाणावरूनच हा गुटखा नंतर किरकोळ एजंटमार्फत शहरातील विक्रेत्यांकडे वितरित करण्यात येतो.
कोणाकडे किती लाखांचा गुटखा
चंद्रनारायण अग्रवाल- पाच लाख
घनश्याम अग्रवाल- १५ लाख
चमण अग्रवाल- १५ लाख
नितीन अग्रवाल- १५ लाख
विजय गुरबानी- १५ लाख