पाच लाखांचा गुटखा जप्त; अकोला जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2018 02:04 AM2018-03-01T02:04:30+5:302018-03-01T02:04:30+5:30
अकोला : जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्या विशेष पथकाचे प्रमुख हर्षराज अळसपुरे यांच्या पथकाने बुधवारी दुपारी प्रतिबंधित असलेल्या गुटख्याच्या साठय़ावर छापा टाकला. त्यावेळी एकास ताब्यात घेण्यात आले असून, त्याच्याकडून पाच लाख रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क

गुटखा माफिया शेख महेबुब शेख हमजा हा एका ओमनी कारमधून गुटख्याचा साठा घेऊन जात असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्या विशेष पथकाचे प्रमुख हर्षराज अळसपुरे यांच्या पथकाला बुधवारी दुपारी गुटखा साठा घेऊन जात असलेल्या ओमनी कारची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे अळसपुरे व पथकाने खडकी पुलावर पाळत ठेवून गुटखा साठा घेऊन येत असलेली कार अडविली. कारमधील तब्बल पाच लाख रुपयांचा गुटख्याचा साठा जप्त करण्यात आला. कारचा चालक तथा गुटखा माफिया शेख महेबुब शेख हमजा याला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई विशेष पथकाचे प्रमुख हर्षराज अळसपुरे व पथकाने केली. दरम्यान अळसपुरे यांनी मार्च २0१७ मध्ये पदभार स्वीकारल्यानंतर तब्बल सव्वाकोटी रुपयांचा गुटखा साठा जप्त करण्यात आला आहे. विशेष पथकाने आतापर्यंंत १६ गुटखा माफियांवर कारवाई केली असून, यामध्ये तब्बल १ कोटी २५ लाख रुपयांच्या दरम्यान गुटखा साठा जप्त केला आहे.