शहरातून तीन लाखांच्या गुटख्याचा साठा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 04:20 AM2021-02-16T04:20:05+5:302021-02-16T04:20:05+5:30
दहशतवाद विरोधी कक्षाची कारवाई अकोला : टावर चौक परिसरात दोन दुकानांतून गुटख्याची विक्री सुरू असल्याच्या माहितीवरून दहशतवाद विरोधी कक्षाने ...
दहशतवाद विरोधी कक्षाची कारवाई
अकोला : टावर चौक परिसरात दोन दुकानांतून गुटख्याची विक्री सुरू असल्याच्या माहितीवरून दहशतवाद विरोधी कक्षाने छापा टाकून तीन लाख रुपयांचा गुटखा साठा जप्त केला. ही कारवाई सोमवारी दुपारी करण्यात आली. या प्रकरणी दोघांविरुद्ध सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
टॉवर चौक परिसरातील ए१ अंडा सेंटर व हरिओम मोबाइल शॉप या ठिकाणावरून गुटख्याची विक्री होत असल्याची माहिती दहशतवाद विरोधी कक्षाचे प्रमुख विलास पाटील यांना मिळाली. या माहितीवरून त्यांनी पथकासह छापा टाकून दोन्ही दुकानांतून सुमारे तीन लाख रुपयांचा तंबाखू व तंबाखूजन्य गुटखा साठा जप्त केला आहे. या प्रकरणी विकी मनोहरलाल गुलाबनी रा.सिंधी कॅम्प व मोहम्मद अनिस अब्दुल हमीद राहणारा अकोट फाइल यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई दहशतवाद विरोधी कक्षाचे प्रमुख विलास पाटील व त्यांच्या पथकाने केली.