वाडेगाव बसस्थानकावर साचले गटार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:14 AM2021-07-02T04:14:07+5:302021-07-02T04:14:07+5:30
बाळापूर - पातूर रस्त्यावरील वाडेगाव बसस्थानकाच्या परिसरात दोन्ही बाजूंना असलेल्या दुकानदारांची वाहने व दुकानात जाणाऱ्या ग्राहकांची वाहने पाण्यामध्ये उभी ...
बाळापूर - पातूर रस्त्यावरील वाडेगाव बसस्थानकाच्या परिसरात दोन्ही बाजूंना असलेल्या दुकानदारांची वाहने व दुकानात जाणाऱ्या ग्राहकांची वाहने पाण्यामध्ये उभी करावी लागतात. त्यामुळे बसस्थानक परिसरात ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत, तसेच वाडेगाव टी पॉइंट ते प्राथमिक आरोग्य केंद्रापर्यंतच्या रस्त्यावर अतिक्रमण वाढले आहे. अतिक्रमणामुळे ग्रामस्थांना जाण्या-येण्यास मोठी कसरत करावी लागत आहे. वाहतुकीची कोंडी होत आहे. बसस्थानक परिसरात मागील एक महिन्यापासून वाहतूक पोलीस तैनात नसून वाहतूक विस्कळीत होत असल्याचे चित्र आहे. याकडे संबंधित विभागाने लक्ष देऊन वाहतूक पोलीस तैनात करण्यात यावा. सोबतच दोन्ही बाजूला मुरूम टाकून रस्ता सुरळीत करण्यात यावा, अशी मागणी व्यावसायिक, दुकानदार व ग्रामस्थांनी केली आहे.
फोटो:
रस्त्याच्या दोन्ही बाजूस दुरुस्ती करून अतिक्रमण व वाहतुकीचा प्रश्न मार्गी लावावा. व्यावसायिक, वाहनचालक व ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागत आहे. याकडे वरिष्ठ व संबंधित प्रशासनाने लक्ष द्यावे.
- राजेश ग्यानुजी डोंगरे,
ग्रामस्थ वाडेगाव
रस्त्याच्या बाजूला कृषी दुकान असून, ग्राहकाला दुकानात येण्यासाठी चिखलातून मार्ग काढावा लागतो. वाहन ठेवण्याची अडचण आहे. याकडे संबंधित यंत्रणेने लक्ष देणे गरजेचे आहे.
-गणेश मानकर, व्यावसायिक, वाडेगाव