गायराने अतिक्रमणमुक्त करुन चारा लागवड करणार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:23 AM2021-09-15T04:23:48+5:302021-09-15T04:23:48+5:30

अकोला: जिल्हयातील ग्रामपंचायती अंतर्गत असलेली गायराने अतिक्रमणमुक्त करुन लोकसहभागातून गायरानांवर चारा लागवड करण्यासंदर्भात जिल्हा प्राणी क्लेष प्रतिबंधक समितीच्या ...

Gyra will cultivate fodder free from encroachment! | गायराने अतिक्रमणमुक्त करुन चारा लागवड करणार !

गायराने अतिक्रमणमुक्त करुन चारा लागवड करणार !

Next

अकोला: जिल्हयातील ग्रामपंचायती अंतर्गत असलेली गायराने अतिक्रमणमुक्त करुन लोकसहभागातून गायरानांवर चारा लागवड करण्यासंदर्भात जिल्हा प्राणी क्लेष प्रतिबंधक समितीच्या बैठकीत मंगळवारी चर्चा करण्यात आली.

जिल्हाधिकारी तथा जिल्हा प्राणी क्लेश प्रतिबंधक समितीच्या अध्यक्ष निमा अरोरा यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीस जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. तुषार बावणे, जिल्हा पशु वैद्यकीय सर्व चिकित्सालयाचे सहायक आयुक्त डॉ. प्रवीण राठोड, पदव्युत्तर पशुवैद्यकीय संस्थेचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. मिलिंद थोरात, डॉ. योगीराज वंजारे, डॉ. प्रकाश गवळी, पशुधन विकास अधिकारी सी.एम. देशमुख, प्रकाश वाघमारे, विजय शिवशंकर जाणी, विशाल बोरे, सुधीर कडू, सचिन आयवडे, मिलिंद निवाने, संदीप वाघाडकर उपस्थित होते. जिल्हयातील ग्रामपंचायती अंतर्गत असलेल्या गायरानवरील अतिक्रमणे लोकसहभागातून मुक्त करून तेथे लोकसहभागातून चारा लागवड करण्याबाबत चर्चा करण्यात आली. तसेच कानशिवणी येथील वनविभागाच्या जमिनीवर तलाव बांधण्यासाठी या प्रकल्पाबाबत वनविभागाने पाहणी अहवाल सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिले.

Web Title: Gyra will cultivate fodder free from encroachment!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.