मुलीच्या फीचे पैसे द्यायचे होते, कपाट उघडले तर चोरी झाल्याचे कळले

By नितिन गव्हाळे | Published: September 28, 2023 04:55 PM2023-09-28T16:55:26+5:302023-09-28T16:57:41+5:30

शिवणीतील प्रियंका देवानंद जगताप(३१) यांच्या तक्रारीनुसार काही दिवसांपूर्वीच त्यांच्या पतीची दीड लाख रूपयांची भिसी उघडली होती.

Had to pay the girl's fees, opened the cupboard and found out that it had been stolen in akola | मुलीच्या फीचे पैसे द्यायचे होते, कपाट उघडले तर चोरी झाल्याचे कळले

मुलीच्या फीचे पैसे द्यायचे होते, कपाट उघडले तर चोरी झाल्याचे कळले

googlenewsNext

अकोला - मुलीच्या शाळेत फीचे २५० रूपये द्यायचे असल्याने, कपाट उघडले. परंतु कपाटातील लॉकरमध्ये ठेवलेले रोख ४८ हजार रूपये आणि सोन्याचे दागिने आढळून आले नाहीत. त्यामुळे घरात चोरी झाल्याचे स्पष्ट झाले. ही घटना २६ सप्टेंबर रोजी शिवणीतील आंबेडकर नगरात सायंकाळी घडली. याप्रकरणात एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

शिवणीतील प्रियंका देवानंद जगताप(३१) यांच्या तक्रारीनुसार काही दिवसांपूर्वीच त्यांच्या पतीची दीड लाख रूपयांची भिसी उघडली होती. या भिसीतील ५० हजार रूपये घरातील कपाटात ठेवलेले हाेते. बचत गटाचे दोन हजार रूपये भरायचे असल्याने, त्या बॅंकेत गेल्या होत्या. दरम्यान त्यांच्या सासु घराचे दार न लावता, बाहेर गेल्या. २६ सप्टेंबर रोजी सायंकाळी परत आल्यावर सर्वांनी जेवण केले.

दरम्यान मुलीने शाळेची फी भरायची असल्याने, २५० रूपये मागितले. त्यावेळी प्रियंका जगताप यांनी कपाट उघडले असता, त्यांना लॉकरमध्ये ठेवलेले ४८ हजार रूपये आणि दोन एकदाणी व मंगळसूत्र, पोथ आदी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे आढळून आले. या प्रकरणात त्यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून, पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Had to pay the girl's fees, opened the cupboard and found out that it had been stolen in akola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.