वन्यप्राण्यांचा हैदोस वाढला; तुरीचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2020 04:32 AM2020-12-14T04:32:51+5:302020-12-14T04:32:51+5:30
यंदा सततचा पाऊस व परतीच्या पावसामुळे खरीप हंगामात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सध्या तुरीवर आशा असताना वन्यप्राण्यांचा ...
यंदा सततचा पाऊस व परतीच्या पावसामुळे खरीप हंगामात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सध्या तुरीवर आशा असताना वन्यप्राण्यांचा हैदोस वाढल्याने शेतकरी हैराण झाला आहे. शेतशिवारात रानडुक्कर, रोही, निलगाय, हरिण, माकडे आदी वन्यप्राणी तुरीच्या पिकावर कळपाने हल्ला चढवित असून, पीक जमीनदोस्त करीत आहेत. याकडे वनविभागाने लक्ष देऊन वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. (फोटो)
------------
शेतकऱ्यांचे रात्री जागरण!
वन्यप्राणी रात्रीच्या सुमारास शेतात जाऊन पिकांची नासाडी करीत आहेत. त्यामुळे शेतकरी रात्री स्वत:चा जीव धोक्यात टाकून जागरण करून पिकाचे रक्षण करीत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे वनविभागाने लक्ष देऊन वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.
--------------------
सध्या तुरीचे पीक बहरलेले असताना वन्यप्राण्यांचा हैदोस वाढला आहे. वनविभागाने वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करावा.
-अनिल लोडम, शेतकरी, कानडी बाजार.