जिल्ह्यात हगणदारीमुक्ती कागदावरच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 04:43 AM2020-12-17T04:43:50+5:302020-12-17T04:43:50+5:30

अकोला : स्वच्छ भारत अभियानांतर्गत जिल्ह्यात ८३६ गावे हगणदारीमुक्त घोषित करण्यात आली असली तरी, अनेक गावांत घरात बांधलेल्या शौचालयांचा ...

Haganadarimukti only on paper in the district! | जिल्ह्यात हगणदारीमुक्ती कागदावरच!

जिल्ह्यात हगणदारीमुक्ती कागदावरच!

Next

अकोला : स्वच्छ भारत अभियानांतर्गत जिल्ह्यात ८३६ गावे हगणदारीमुक्त घोषित करण्यात आली असली तरी, अनेक गावांत घरात बांधलेल्या शौचालयांचा वापर न करता, उघड्यावर शौच वारी सुरू असल्याने, गावांच्या वेशीवर घाण कायमच आहे. त्यामुळे जिल्ह्यातील हगणदारीमुक्ती केवळ कागदावरच असल्याचे वास्तव आहे.

स्वच्छ भारत अभियान, निर्मल भारत अभियान व घरकुल योजनेअंतर्गत वैयक्तिक शौचालय बांधकामासाठी ग्रामीण भागातील लाभार्थींना शासनामार्फत प्रत्येकी १२ हजार रुपयांचे अनुदान दिले जाते. २०१२ मध्ये जिल्ह्यात करण्यात आलेल्या पायाभूत सर्वेक्षणानुसार जिल्ह्यातील ८४२ गावांपैकी ८३६ गावे मार्च २०१८ पर्यंत हगणदारीमुक्त घोषित करण्यात आली. २०१२ ते नोव्हेंबर २०२० अखेरपर्यंत जिल्ह्यात २ लाख ६ हजार १८८ वैयक्तिक शौचालयांची बांधकामे पूर्ण करण्यात आली होती. सद्य:स्थितीत ६९ शौचालयांची बांधकामे प्रगतिपथावर असून, जिल्ह्यातील २ लाख ६३७ कुटुंबांकडे अद्याप वैयक्तिक शौचालयांची सुविधा नाही. या कुटुंबांना शौचालय सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शौचालय बांधकामांसाठी अनुदानाचा प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागामार्फत गेल्या ऑक्टोबरमध्ये शासनाकडे सादर करण्यात आला आहे. स्वच्छ भारत अभियानांतर्गत जिल्ह्यात ८३६ गावे हगणदारीमुक्त जाहीर करण्यात आली; मात्र घरात शौचालय असूनही अनेक गावांत त्याचा वापर करण्यात येत नसल्याने आणि उघड्यावर शौच वारी सुरू असल्याने गावाच्या वेशीवर घाण कायम आहे. त्याअनुषंगाने जिल्ह्यातील हगणदारीमुक्ती कागदावरच असल्याचे वास्तव आहे.

बांधण्यात आलेली शौचालये (तालुकानिहाय)

अकोला ३८,०९३

अकोट ३१,९५६

बाळापूर २९,४३०

बार्शीटाकळी २७,३१६

मूर्तिजापूर २८,२९५

पातूर २१,५७१

तेल्हारा २९,५२७

जिल्ह्यात शौचालय नसलेल्या कुटुंबांची संख्या

२६३७

शौचालयांचे बांधकाम जिल्ह्यात प्रगतिपथावर

६९

गावात ९५ टक्के कुटुंबांकडे शौचालय सुविधा आहे. पाच टक्के कुटुंबांकडे शौचालय नाही. घरात शौचालय असलेल्या कुटुंबांपैकी ५५ ते ६० टक्के कुटुंब शौचालयाचा वापर करीत असून, उर्वरित ३५ ते ४० टक्के कुटुंब घरात शौचालय असूनही त्याचा वापर करीत नाही. शौचालय असलेल्या कुटुंबांनी शौचालयाचा वापर केला पाहिजे.

-दिलीप मोहोड, सरपंच, आखतवाडा

शौचालयाचा वापर कशासाठी?

जिल्ह्यात अनेक घरांत बांधण्यात आलेल्या शौचालयाचा वापर शौचविधीसाठी करण्यात येत नाही. कुटार, कडबा तसेच विविध टाकाऊ वस्तू ठेवण्यासाठी शौचालयांचा वापर करण्यात येत असल्याचे चित्र अनेक गावांत दिसते.

Web Title: Haganadarimukti only on paper in the district!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.