वाढदिवसाच्या पार्टीतील दारुड्यांच्या शहरात हैदाेस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2020 04:13 AM2020-12-07T04:13:00+5:302020-12-07T04:13:00+5:30
अकाेला : रिपाइंचा महानगराध्यक्ष गजानन कांबळे याच्या वाढदिवसानिमित्त शनिवारी रात्री वाशिम बायपास येथे आयाेजित पार्टीत दारुड्यांनी यथेच्छ धुडगूस घालत ...
अकाेला : रिपाइंचा महानगराध्यक्ष गजानन कांबळे याच्या वाढदिवसानिमित्त शनिवारी रात्री वाशिम बायपास येथे आयाेजित पार्टीत दारुड्यांनी यथेच्छ धुडगूस घालत शहरात हैदाेस घातला. वाशिम बायपास येथे वाहनांची ताेडफाेड केली. या प्रकरणात जुने शहर पाेलीस ठाण्यात ३० जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून, सात आराेपींना अटक करण्यात आली आहे. गजानन कांबळे, फिराेज खान व युवराज भागवत हे तीन मुख्य आराेपी फरार असून, पाेलीस त्यांचा शाेध घेत आहेत.
वाशिम बायपासवरील एका हाॅटेलमध्ये व त्यासमाेरील जागेत गजानन कांबळे याचा वाढदिवस साजरा करण्यात येत हाेता. या दरम्यान यथेच्छ मद्यप्राशन केलेल्या गुंडप्रवृत्तीच्या युवकांनी या राेडवरून जात असलेल्या बसेसच्या काचा विनाकारण फाेडल्या. तसेच काही नागरिकांनाही मारहाण केली. काही जणांवर चाकूहल्लाही झाल्याची माहिती आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पाेलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठून येथे सुरू असलेली हाणामारी राेखली; मात्र ताेपर्यंत गजानन कांबळे, फिराेज खान व युवराज भागवत हे तिघे जण घटनास्थळावरून पसार झाले. पाेलिसांनी सात आराेपींना अटक केली आहे. तर सुमारे २५ आराेपी अद्यापही फरार असून, पाेलीस त्यांचा शाेध घेत आहेत. या प्रकरणी जुने शहर पाेलिसांनी गजानन कांबळे, युवराज भागवत व फिराेज खान या तिघांविरुध्द भारतीय दंड विधानाच्या कलम ३५३, १४३, १४७, १४९, ४२७ अन्वये तसेच कलम ७ व ३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
..................................
पाेलिसांवर गुंडप्रवृत्ती ठरतेय भारी
शहरात गुंडप्रवृत्तींचा हैदाेस वाढला असताना पाेलीस मात्र बघ्याची भूमिका घेत आहेत. जुने शहर पाेलीस ठाण्याच्या हद्दीत हैदाेस अन धुडगूस सुरू असताना पाेलिसांनी बसेस ताेडफाेड व नागरिकांना मारहाण हाेण्यापूर्वी त्यांच्यावर कारवाई का केली नाही, असा सवाल उपस्थित केल्या जात आहे. पाेलीस अधीक्षक विविध उपक्रम राबवित असले तरी गुंडांचा बंदाेबस्त करण्यात मात्र त्यांना अद्यापही गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे.
.........................................