अकोल्यात ‘जय हनुमान’चा जयघोष!
By admin | Published: April 12, 2017 02:14 AM2017-04-12T02:14:53+5:302017-04-12T02:14:53+5:30
अकोला: हनुमान जन्मोत्सवाचा मुहूर्त साधत शहरात पहिल्यांदाच मोठ्या उत्साहात शोभायात्रा काढण्यात आली.
अकोला: हनुमान जन्मोत्सवाचा मुहूर्त साधत शहरात पहिल्यांदाच मोठ्या उत्साहात शोभायात्रा काढण्यात आली. शहराचे आराध्य दैवत श्री राजराजेश्वर मंदिर येथे जगन्नाथपुरीच्या जगप्रसिद्ध रथयात्रेच्या धर्तीवर हनुमंताच्या रथाचे यथोचित पूजन क रून शोभायात्रेला प्रारंभ झाला.
राजराजेश्वर मंदिर येथे हनुमंताच्या रथाचे हनुमान जयंती शोभायात्रा समितीच्या वतीने बबनराव चौधरी, आ. गोपीकिशन बाजोरिया, माजी आमदार लक्ष्मणराव तायडे, नातिकोद्दीन खतीब, हरिदास भदे, मदन भरगड, श्रीकांत पिसे पाटील, क्रिष्णा अंधारे, सुरेश पाटील, अविनाश देशमुख, संदीप पाटील लोड, रमाकांत खेतान, डॉ. अशोक ओळंबे पाटील, पंकज साबळे, राजेश मिश्रा, सागर भारुका, मनोज साहू, दत्ता देशमुख, अजय तापडिया, चंद्रकांत सावजी, राजू इटोले, महेंद्रसिंग सलुजा, उषा विरक, सुषमा निचळ, योगेश बुंदेले, निशिकांत बडगे, अजय गावंडे, पंकज जायले, सागर कावरे, योगेश थोरात, देवानंद टाले, क्रिष्णा शर्मा, रत्नपारखी, रोहित तारकस, नीलेश पाटील यांनी पूजन केले. जयहिंद चौकातून मोठ्या उत्साहात ढोल-ताशांच्या गजरात निघालेल्या शोभायात्रेत आबालवृद्धांसह बच्चे कंपनीची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. शोभायात्रा जयहिंद चौक मार्गे लोखंडी पूल, सिटी कोतवाली चौकातून गांधी रोड, महापालिका कार्यालयासमोरून पंचायत समिती मार्ग व तेथून थेट वसंत सिनेमागृह मार्गे मुख्य गणेश घाटावर मार्गस्थ झाली. यावेळी घाटावर महाआरती करून राममंदिर पसिरात शोभायात्रेचा समारोप करण्यात आला.