पश्चिम व-हाडात मेघगर्जनेसह गारपीट, खरीप, रब्बी पिकांसह भाजीपाला, फळपिकांचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2018 02:18 PM2018-02-11T14:18:56+5:302018-02-11T14:19:02+5:30

पश्चिम विदर्भात (व-हाड) रविवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास मेघगर्जनेसह गारपीट झाल्याने खरीपातील तूर, रब्बी हंगामातील हरभरा, भाजीपाला पिकासह फळपिकांचे नुकसान झाले.

Hailstorm along with hailstorm, Kharip, Vegetable with rabbi crops, Fruit damage | पश्चिम व-हाडात मेघगर्जनेसह गारपीट, खरीप, रब्बी पिकांसह भाजीपाला, फळपिकांचे नुकसान

पश्चिम व-हाडात मेघगर्जनेसह गारपीट, खरीप, रब्बी पिकांसह भाजीपाला, फळपिकांचे नुकसान

googlenewsNext

अकोला : पश्चिम विदर्भात (व-हाड) रविवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास मेघगर्जनेसह गारपीट झाल्याने खरीपातील तूर, रब्बी हंगामातील हरभरा, भाजीपाला पिकासह फळपिकांचे नुकसान झाले. वाशिम जिल्ह्यात गारांच्या तडाख्यात सापडून वृद्धेचा मृत्यू झाला तर याच जिल्ह्यात वीज अंगावर पडून एक जनावर ठार झाले.

अकोला जिल्ह्यात रविवारी सकाळी गारपीट झाल्याने हरभरा पिकासह रब्बीच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सकाळी 6 वाजतापासून तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड, सौन्दला, सिरसोली, आडगाव परिसरात विजेच्या कडकडाटासह गारपीट झाली, गारपीट झाल्याने पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले. गत दोन- चार दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळी वातावरण आहे. रविवारी सकाळच्या सुमारास काही भागात अवकाळी पाऊस, गारपीट झाल्याने शेतक-यांवर जणू आभाळच कोसळले.

वादळी पाऊस आणि गारपीट झाल्याने उरलासुरला रब्बी हंगामही हातचा जाण्याची वेळ शेतक-यांवर येऊन ठेपली आहे. वादळी पाऊस आणि गारपिटीने झोडपून काढल्याने फळबागा आणि रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अकोट, बाळापूर, पातूर, बार्शीटाकळी, मूर्तिजापूर तालुक्यातही काही ठिकाणी गारपीट व अवकाळी पाऊस झाला, वादळी पाऊस झाला. पाऊस आणि गारपीट झालेल्या भागातील पिके जमीनदोस्त झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या पावसाचा सर्वधिक फटका सोंगणी करून ठेवलेल्या हरभरा पिकला बसला आहे.तसेच तूर, गहू, फळबागांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

वाशिम जिल्हयात रविवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास वाशिम जिल्ह्यात काही ठिकाणी गारपीट व अवकाळी पाऊस झाला. रिसोड व मालेगाव तालुक्यात वादळी पाऊस व गारपीट झाल्याने पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले. रिसोड तालुक्यातील वाकद, केनवड, कोयाळी, गणेशपूर, बाळखेड, बोरखेडी, गौंढाळा यासह २५ गावांत अवकाळी पाऊस व गारपीट झाल्याने रब्बी हंगामातील पिकांसह फळबागांचे नुकसान झाले. मालेगाव तालुक्यात शिरपूर, राजुरा, मेडशी परिसरातही अवकाळी पाऊस झाल्याने पिकांचे नुकसान झाले. दरम्यान, रिसोड तालुक्यातील महागाव येथील यमुनाबाई हुंबाड या वृद्ध महिलेचा गारांच्या तडाख्यात सापडून मृत्यू झाला तर चिंचाबा भर येथे वीज पडून एक जनावर ठार झाले. वाशिम व मंगरूळपीर तालुक्यातही विजांच्या कडकडाटात अवकाळी पाऊस झाल्याने पिकांचे नुकसान झाले.
बुलडाणा जिल्ह्यात दोन दिवसापासून असलेल्या ढगाळ वातावरणानंतर रविवारी सकाळी जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यात गारपीट झाली. यामुळ गहू, हरबरा, कांदा, द्राक्षबागा आणि आंब्याचे नुकसान झाले. दरम्यान, लोणार तालुक्यातील १८ गावात गारपीटीचे प्रमाण अधिक होते, असे सूत्रांनी सांगितले.
- शेतक-यांची तारांबळ
सध्या हरभरा काढणीचा हंगाम सुरू आहे. त्यामुळे शेतक?्यांचा माल शेतात पडलेला आहे. अचानक गारपीट व अवकाळी पाऊस पडल्या मुळे शेतकºयांची तारांबळ उडाली होती.

Web Title: Hailstorm along with hailstorm, Kharip, Vegetable with rabbi crops, Fruit damage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.