रिधोरा, दधम परिसरात गारपीट ; ओवा, कांदा, भाजीपाला व गहू पिकांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:19 AM2021-03-25T04:19:08+5:302021-03-25T04:19:08+5:30
आज शनिवारी सायंकाळच्या सुमारास वादळ वाऱ्यासह आलेल्या अवकाळी पावसाचा चांगलाच फटका बसला. तर रिधोरा व दधम परीसरात गारपीट झाली ...
आज शनिवारी सायंकाळच्या सुमारास वादळ वाऱ्यासह आलेल्या अवकाळी पावसाचा चांगलाच फटका बसला. तर रिधोरा व दधम परीसरात गारपीट झाली आहे. परीसरात कांदा व काढणीला आलेल्या गव्हाचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे. तर रिधोरा येथील शेतकरी मनोज अग्रवाल यांच्या पाच एकरातील ओव्याचे पिक वाऱ्यामुळे भुईसपाट झाले आहे. त्यामुळे त्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. तर
सध्या परिसरात अंतिम टप्प्यातील कांदा व गव्हाची काढणी सुरू आहे तर काही शेतात गव्हाचे पिक शेतात उभे आहे.
आज सायंकाळी अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. अवकाळी पावसाने कांदा पिकला सर्वात जास्त फटका बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तर, उभा असलेल्या गहू पिकालाही मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने अवकाळी पावसाचा धोका असल्याचे भाकीत केले असल्याने कष्टकरी शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले असून, चिंतेत वाढ झाली आहे.
फोटो: