युवतीचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळला; घातपाताचा संशय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 04:18 AM2021-03-14T04:18:13+5:302021-03-14T04:18:13+5:30

पळसो रोडवरील यावलखेड परिसरातील घटना घटनास्थळावर आढळली सायकल, पर्स अकोला/ बोरगाव मंजू : बोरगाव मंजू पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पळसो ...

The half-burnt body of the young woman was found; Suspicion of assassination | युवतीचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळला; घातपाताचा संशय

युवतीचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळला; घातपाताचा संशय

googlenewsNext

पळसो रोडवरील यावलखेड परिसरातील घटना

घटनास्थळावर आढळली सायकल, पर्स

अकोला/ बोरगाव मंजू : बोरगाव मंजू पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पळसो रोडवरील यावलखेड शेत शिवारात एका 18 वर्षीय युवतीचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळल्याने शनिवारी सकाळी खळबळ उडाली. या युवतीने आत्महत्या केल्याची चिठ्ठी घटनास्थळावर आढळली. मात्र मृतदेह जंगलात असल्याने घातपाताचा संशयही व्यक्त करण्यात येत असून, पोलिसांनी त्या दिशेने तपास सुरू केला आहे.

मूळची निंबी मालोकार येथील रहिवासी, तसेच डाबकी रोडवर भाड्याने राहणारी समीक्षा श्रीकृष्ण देवर (वय 18 वर्षे) या युवतीचा यावलखेड शेत शिवारातील गॅस गोडावूनमागे अर्धवट जळालेल्या परिस्थितीत मृतदेह आढळला. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळ गाठले. युवतीचा मृतदेह पाहून घातपात असल्याचा संशय पोलिसांना आल्याने बोरगाव मंजू पोलिसांनी तातडीने मोबाइल फॉरेन्सिक व्हॅन, ठसे तज्ज्ञ, तसेच श्वानपथकाला पाचारण केले. यावरून घटनास्थळ पुरावे गोळा करून पंचनामा करण्यात आला. त्यानंतर समीक्षा देवर हिचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सर्वोपचार रुग्णालयात पाठविण्यात आला. युवतीच्या मृतदेहाजवळ एक सायकल, पर्स तसेच इतर साहित्य पडून होते. पोलिसांनी ते ताब्यात घेतले असून, त्यावरील ठसे तपासणी करण्यात येत आहेत. या घटनेची माहिती मिळताच मूर्तिजापूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष राऊत, ठाणेदार सुनील सोळंके आणि गुन्हे शाखाप्रमुख शैलेश सपकाळ यांनी घटनास्थळावर धाव घेतली. त्यानंतर तातडीने या प्रकरणाच्या तपासाला सुरुवात केली असून, घातपात की आत्महत्या, याचा उलगडा करण्याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे.

Web Title: The half-burnt body of the young woman was found; Suspicion of assassination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.