अर्धा पाव अतिरिक्त साखरेतच दिवाळी!

By admin | Published: October 22, 2016 02:50 AM2016-10-22T02:50:30+5:302016-10-22T02:50:30+5:30

स्वस्त धान्य दुकानांना दिला गरिबांसाठी कोटा; अकोला जिल्हय़ातील साडेसात लाख लाभार्थी!

Half a pipe extra sugar diwali! | अर्धा पाव अतिरिक्त साखरेतच दिवाळी!

अर्धा पाव अतिरिक्त साखरेतच दिवाळी!

Next

संतोष येलकर
अकोला, दि. २१-दिवाळी सणाच्या पृष्ठभूमीवर सार्वजनिक वितरण व्यवस्था अंतर्गत दारिद्रय़रेषेखालील (बीपीएल) आणि अंत्योदय योजनेंतर्गत शिधापत्रिकाधारक लाभार्थ्यांना दरमहा मिळणार्‍या साखरेच्या तुलनेत केवळ १५0 ग्रॅम अतिरिक्त साखर वितरित करण्यात येत आहे. याचा लाभ जिल्हय़ातील ७ लाख ५३ हजार १८५ गरीब शिधापत्रिकाधारक लाभार्थ्यांना होणार आहे. दिवाळी मध्ये प्रत्येक घरामध्ये मिठाईचे पदार्थ तयार होतात यासाठी साखरेची खरेदी मोठया प्रमाणात केली जाते असे असतांना केवळ अर्धापाव साखर अतिरिक्त देऊन शासनाने गरीबांची थटटा केल्याची प्रतिक्रीया उमटत आहेत.
सार्वजनिक वितरण व्यवस्था अंतर्गत दारिद्रय़रेषेखालील (बीपीएल) आणि अंत्योदय योजनेतील शिधापत्रिकाधारकांना कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीसाठी (युनिट) ५00 ग्रॅम याप्रमाणे साखर वितरित केली जाते. शासनाच्या निर्णयानुसार यंदाच्या दिवाळीत बीपीएल आणि अंत्योदय गरीब शिधापत्रिकाधारकांच्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीसाठी १५0 ग्रॅम अतिरिक्त साखर वितरित करण्यात येत आहे. म्हणजेच गरीब लाभार्थी शिधापत्रिकाधारकांना प्रतियुनिट ६५0 गॅ्रमप्रमाणे साखर वितरित करण्यात येत आहे. त्यानुषंगाने अकोला जिल्हय़ातील बीपीएल व अंत्योदय योजनेंतर्गत शिधापत्रिकाधारक कुटुंबातील ७ लाख ५३ हजार १८५ लाभार्थ्यांना प्रत्येकी ६५0 ग्रॅमप्रमाणे साखर वितरित करण्यासाठी ३ हजार ६७८ क्विंटल साखरेचा साठा गत सप्टेंबर अखेर शासनामार्फत प्राप्त झाला. त्यानुसार पुरवठा विभागामार्फत जिल्हय़ातील गरीब शिधापत्रिकाधारकांना साखरेचे वितरण सुरू करण्यात आले आहे. त्यामध्ये नेहमी दरमहा वितरित करण्यात येत असलेल्या साखरेसोबत १५0 ग्रॅम अतिरिक्त साखर वितरित करण्यात येत आहे.

तालुकानिहाय प्राप्त साखरेचा साठा!
जिल्हय़ातील बीपीएल व अंत्योदय योजनेतील लाभार्थी शिधापत्रिकाधारकांना प्रतिव्यक्ती ६५0 ग्रॅमप्रमाणे साखर वितरित करण्यासाठी ३ हजार ६७८ क्विंटल साखरेचा साठा उपलब्ध झाला. त्यामध्ये अकोला शहर व ग्रामीण भागासाठी ९0६ क्विंटल, बाश्रीटाकळी तालुक्यासाठी ३३0 क्विंटल, अकोट ९२४ क्विंटल, तेल्हारा ३९६ क्विंटल, बाळापूर ३९६ क्विंटल, पातूर ३९६ क्विंटल व मूर्तिजापूर तालुक्यासाठी ३३0 क्विंटल साखर साठा उपलब्ध झाला

जिल्हय़ातील बीपीएल व अंत्योदय योजनेंतर्गत लाभार्थी शिधापत्रिकाधारकांच्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीस दिवाळीत १५0 ग्रॅम अतिरिक्त साखर वितरित करण्यात येत आहे. दरमहा वितरित करावयाची साखर आणि अतिरिक्त साखर वितरित करण्यासाठी ३ हजार ६७८ क्विंटल साखरेचा साठा उपलब्ध झाला असून, निर्देशानुसार लाभार्थ्यांना साखरेचे वितरण करण्यात येत आहे.
-अनिल टाकसाळे,
जिल्हा पुरवठा अधिकारी.

असे आहेत लाभार्थी!
तालुका      लाभार्थी व्यक्ती
अकोला       १७७१६२
अकोट         १५७५५३
बाश्रीटाकळी   ८५६२१
बाळापूर        ११३४२१
तेल्हारा          ७५५१९
पातूर               ७२१0५
मूर्तिजापूर        ७१८0५

Web Title: Half a pipe extra sugar diwali!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.