हातपंप नादुरूस्त; महिलांचा मनपात घागर माेर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2020 07:48 PM2020-11-24T19:48:18+5:302020-11-24T19:48:46+5:30
Akola News नगरसेविका सपना नवले यांच्यासह महिलांनी घागर माेर्चा काढत मंगळवारी मनपात धाव घेतली.
अकाेला:जुने शहरातील प्रभाग क्र. १८ अंतर्गत येणाऱ्या शिवसेना वसाहतमधील हातपंप, सबमर्सिबल पंप नादुरूस्त आहेत. तसेच ‘अमृत’ अभियानअंतर्गत जलवाहिनीचे जाळे अर्धवट टाकण्यात आल्यामुळे पाण्याची समस्या निर्माण झाल्याचा आराेप करीत शिवसेनेच्या नगरसेविका सपना नवले यांच्यासह महिलांनी घागर माेर्चा काढत मंगळवारी मनपात धाव घेतली.
जुने शहरातील प्रभाग क्र.१८ मधील शिवसेना वसाहतमध्ये जलवाहिनीचे जाळे अर्धवट टाकण्यात आले असून निकषानुसार काम झाले नसल्याची परिस्थिती आहे. यासाेबतच वसाहतमधील हातपंप, सबमर्सिबल पंप मागील दाेन महिन्यांपासून नादुरूस्त असल्यामुळे पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. मनपाच्या जलप्रदाय विभागामार्फत देखभाल दुरूस्तीची कामे करणाऱ्या कंत्राटदारांची देयके थकित असून देयक अदा करण्यासाठी सत्ताधारी पक्षाकडून माेठ्या प्रमाणात कमिशन मागितल्या जात असल्याचे कंत्राटदार सांगतात, असे नगरसेविका सपना नवले यांच्या पत्रकात नमुद आहे. तसेच प्रभागातील जलवाहिन्यांना गळती लागल्यामुळे नागरिकांना दुषित पाण्याचा पुरवठा हाेताे. यामुळे त्यांचे आराेग्य धाेक्यात सापडले असून प्रशासनाने तातडीने नादुरूस्त हातपंप दुरूस्त करून जलवाहिनीचे जाळे टाकण्याची मागणी करीत नगरसेविका सपना नवले यांच्यासह महिलांनी डाेक्यावर घागर घेऊन मनपात निवेदन सादर केले. यावेळी जलप्रदायचे कायर्कारी अभियंता सुरेश हुंगे यांना निवेदन देण्यात आले.
शिवसेना वसाहतमध्ये ‘अमृत’अभियानमधील जलवाहिनीचे जाळे टाकण्याचे काम काही राजकीय व्यक्तींनी बंद केल्याची माहिती आहे. ते तातडीने सुरु केले जाइल. कामात अडथळा निर्माण करणाऱ्यांविराेधात कठाेर पाऊले उचलल्या जातील. या भागात माेजके हातपंप,सबमर्सिबल पंप बंद असल्याची माहिती आहे. त्यांची लवकरच दुरूस्ती केली जाइल.
-संजय कापडणीस आयुक्त, मनपा