३१ गावांत हातपंप दुरुस्तीची कामे सुरु!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 04:21 AM2021-03-09T04:21:33+5:302021-03-09T04:21:33+5:30
......................................................... पाणीटंचाइ निवारणाच्या कामांचा मार्ग मोकळा! अकोला: जिल्ह्यातील ग्रामीण भागात संभाव्य पाणीटंचाइ निवारणासाठी उपाययोजनांच्या कृती आराखड्यास सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांनी मान्यता ...
.........................................................
पाणीटंचाइ निवारणाच्या कामांचा मार्ग मोकळा!
अकोला: जिल्ह्यातील ग्रामीण भागात संभाव्य पाणीटंचाइ निवारणासाठी उपाययोजनांच्या कृती आराखड्यास सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांनी मान्यता दिल्याने, प्रस्तावित पाणीटंचाइ निवारणाच्या कामांचा मार्ग मोकळा झाला आहे.त्यासाठी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाला आता कामांचे प्रस्ताव प्रशासकीय मान्यतेसाठी सादर करावे लागणार आहेत.
.....................................................................
कोवीड चाचणी कामाची घेतली माहिती!.
अकोला: कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग नियंत्रित करण्यासाठी अकोला शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात कोवीड चाचणीची विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्यानुषंगाने अकोल्याचे उपविभागीय दंडाधिकारी निलेश अपार यांनी सोमवारी कोवीड चाचणी कामाची माहिती घेतली.
.........................................................................
‘सीइओ’नी घेतला आढावा!
अकोला: जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार यांनी सोमवारी जिल्हा परिषद आरोग्य विभागामार्फत जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोना विषाणूचा संसर्ग नियंत्रित करण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या विविध उपाययोजनांच्या कामांचा आढावा घेतला. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडून त्यांनी संबंधित विषयांची माहिती घेतली.
....................................................................
नगरपालिका क्षेत्रातील कामांचा आढावा
अकोला: जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नगरपालिका प्रशासन विभागांतर्गत जिल्ह्यातील नगरपालिका क्षेत्रातील विविध कामांचा आढावा निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी सोमवारी आढावा घेतला. त्यामध्ये प्रामुख्याने कोरोना विषाणूचा संसर्ग नियंत्रित करण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती घेण्यात आली.