लग्नासाठी मुली दाखवून फसवणूक करणाऱ्या टाेळीला ठाेकल्या बेड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:19 AM2021-01-25T04:19:02+5:302021-01-25T04:19:02+5:30
अकाेला : उपवर युवकांना सुंदर मुली दाखवून त्या माेबदल्यात लाखाेंची रक्कम उकळणाऱ्या एका माेठ्या टाेळीला बेड्या ठाेकण्यात डाबकी राेड ...
अकाेला : उपवर युवकांना सुंदर मुली दाखवून त्या माेबदल्यात लाखाेंची रक्कम उकळणाऱ्या एका माेठ्या टाेळीला बेड्या ठाेकण्यात डाबकी राेड पाेलिसांना शनिवारी यश आले. जळगाव खान्देश आाणि नंदुरबार येथील दाेन उपवर युवकांना तब्बल एक लाख ८० हजार रुपयांनी या टाेळीने गंडविल्यानंतर दाेन महिलांसह पाच जणांना पाेलिसांनी अटक केली. त्यांना रविवारी न्यायालयासमाेर हजर करण्यात येणार आहे.
वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील पांघरी नवघरे येथील रहिवासी सुदाम तुळशीराम करवते ऊर्फ याेगेश मूळ नाव गुलाब नारायण ठाकरे हा या टाेळीचा म्हाेरक्या असून त्याचे साथीदार शंकर बाळू साेळंके रा. सातमैल, वाशिम राेड, अकाेला, संताेष ऊर्फ गाेंडू सीताराम गुडधे रा. आगीखेड, ता. पातूर, हरसिंग ओंकार साेळंके रा. चांदुर, ता. अकाेला या तीन जणांसह दाेन महिला एक जळगाव, खान्देश येथील तर दुसरी अकाेला येथील या पाच आराेपींना डाबकी राेड पाेलिसांनी शनिवारी अटक केली. या टाेळीने लग्नासाठी मुली असल्याचे सांगत जळगाव, खान्देश आणि नंदुरबार येथील उपवर युवकास एक लाख ८० हजार रुपयांनी गंडविले. यामध्ये जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील करमूड या गावातील रहिवासी अतुल ज्ञानेश्वर साेनवने पाटील या उपवर युवकास अकाेल्यातील या पाच जणांच्या टाेळीने सुंदर मुलींचे फाेटाे पाठविले व लग्नाचे आमिष दिले. या आमिषाला बळी पडत अतुल पाटील यांना एक लाख ५० हजार रुपयांची मागणी केली. मात्र पाटील यांनी २० हजारांची रक्कम देऊन मुलगी दाखविण्याची मागणी केली. मुलगी दाखविल्यानंतर अतुल पाटील यांनी लग्नाची मागणी घातली असता आराेपींनी टाळाटाळ केली. त्यामुळे पाटील यांना फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी डाबकी राेड पाेलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर असाच प्रकार पुन्हा नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील वडाळी येथील रहिवासी राहुल विजय पाटील (२८) यांच्यासाेबतही घडला. त्यांना पातूर येथील सुदाम तुळशीराम करवते ऊर्फ योगेश याच्याशी झाली. त्यानंतर सुदामसोबत चर्चा झाली असता सुदामने काही मुलींचे फोटो पाठविले व यातून मुलगी पसंत करण्याचे सांगितले. मुलगी पसंत येताच मुलीच्या वडिलांना एक लाख ६० हजार रुपये द्या आणि मुलीसाेबत लग्न करून तिला घेऊन जा, असे सांगितले. त्यानुसार १० डिसेंबर २०२० रोजी राहुल पाटील यांचा पूर्ण परिवार अकाेल्यात आला. त्यांना मुलगी दाखवून तिच्याशी लग्न करायचे असेल तर पातूर रोडवरील महालक्ष्मी माता मंदिरात येण्यास सांगितले. त्यानुसार लग्नाचा विधी पूर्ण करून त्यांच्याकडून एक लाख ३० हजार रुपयांची रक्कम घेतली. मुलगी नवऱ्यासाेबत जात असतानाच प्रभात किड्स शाळेजवळ दुचाकीवर आलेल्या दोघांनी त्यांच्याशी वाद घालत गावातील मुलींना पैसे देऊन घेऊन जात असल्याची आरडाओरड केली. त्यानंतर नवरी गाडीतून उतरली आणि आलेल्या युवकाच्या दुचाकीवर बसून निघून गेली. त्यामुळे फसवणूक झाल्याचे पाटील यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनीही डाबकी रोड पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पाेलिसांनी या दाेन्ही प्रकरणात भारतीय दंड विधानाच्या कलम ४२०, ५०४, ३४, ४६५,४६७,४६८,४७१, अन्वये फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.
उपवर युवकांशी लग्नाचा विधी करणाऱ्या मुली माेकाट
उपवर युवकांना भेटल्यानंतर त्यांना मुलगा पसंत असल्याचे त्या अमाेरासमाेर सांगत हाेत्या. एवढेच नव्हे तर मुलासाेबत लग्नाचा पूर्ण विधीही त्या करीत हाेत्या. मात्र गावाकडे परत जाताना या मुली अपहरण तसेच विविध प्रकारच्या धमक्या देऊन मुलाजवळून निघून जातात. यावरून या मुलीही तेवढ्याच दाेषी असल्या तरी त्या अद्यापही माेकाट आहेत. या मुलींवर आता कारवाई न केल्यास त्या यापुढेही अनेक युवकांना असा गंडा घालतील त्यामुळे या मुलींनाही बेड्या ठाेकण्याची मागणी फसवणूक झालेल्या युवकांनी केली आहे.