दातृत्वाचे हात धावले अन् महिनाभराची साेय झाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 04:19 AM2021-04-08T04:19:17+5:302021-04-08T04:19:17+5:30
शिवसेनेचे उपशहर प्रमुख अतुल पवनीकर यांनी सूर्याेदय आश्रम तसेच आनंदाश्रमासाठी मदतीचा हात पुढे केला आहे अकाेल्यातील सूर्याेदय आश्रमात ...
शिवसेनेचे उपशहर प्रमुख अतुल पवनीकर यांनी सूर्याेदय आश्रम तसेच आनंदाश्रमासाठी मदतीचा हात पुढे केला आहे
अकाेल्यातील सूर्याेदय आश्रमात ४२ एचआयव्ही बाधित मुलांचे संगाेपन हाेते. काेराेनामुळे आश्रमाच्या मदतीचा ओघ आटला आहे. या आश्रमाने शासनाकडे मदतीचा प्रस्ताव पाठविला आहे, ताे प्रलंबितच आहे ताे मंजूर हाेणे गरजेचे आहे या मुलांसाठी एक महिन्याचे धान्य पवनीकर यांनी बुधवारी सुपूर्द केले या आश्रमाप्रमाणेच गुडधी येथील आनंदाश्रमात १३ मुली आहेत. हा आश्रम मुलींसाठीच आहे. वाढदिवस किंवा इतर काैटुंबिक आनंदांच्या प्रसंगी आश्रमात येणाऱ्या दात्यांचा ओघ मंदावल्याने आश्रमाचे आर्थिक नियेाजन काेलमडले आहे. या आश्रमासाठीही पवनीकर यांनी एक महिन्याचे धान्य दिले
काेट
समाजातील दात्यांच्या मदतीने एचआयव्ही बाधित मुलांचे संगाेपन सुरू आहे. काेराेनामुळे गेल्या वर्षभरापासून मदतीचा ओघ कमी झाल्यामुळे अडचणींचा सामना करावा लागत आहे मात्र संकटातही मदतीचे हात पुढे येतात याचे दर्शन पवनीकर यांच्या सहकार्यामुळे झाले
शिवराज पाटील प्रकल्प समन्वयक सूर्याेदय आश्रम
बाॅक्स
काेराेनाबाधित पालकांच्या मुलांसाठी देणार जेवणाचा डबा
सध्या काेराेनाचा प्रादूर्भाव माेठया प्रमाणात झाला असून ज्या घरामध्ये आई वडील काेराेनाबाधित असून मुलांच्याकडे लक्ष देण्याकरिता घरात काेणी ज्येष्ठ सदस्य नसेल अशा मुलांसाठी दरराेज जेवण पुरविण्याचा संकल्प पवनीकर यांनी केला असून गरजवंतांनी संपर्क करण्याचे आवाहन त्यांनी केेले आहे