हनुमान जयंती भंडाऱ्याचा खर्च दिला बालकांसाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:19 AM2021-04-28T04:19:46+5:302021-04-28T04:19:46+5:30

.......................... लसीकरणासाठी डाेसनिहाय रांग लावा अकाेला : महानगरपालिकेच्या क्षेत्रात लसीकरण केंद्रावर पहिला व दुसरा डोस घेणारे नागरिक येत असल्याने ...

Hanuman Jayanti Bhandara paid for the children | हनुमान जयंती भंडाऱ्याचा खर्च दिला बालकांसाठी

हनुमान जयंती भंडाऱ्याचा खर्च दिला बालकांसाठी

Next

..........................

लसीकरणासाठी डाेसनिहाय रांग लावा

अकाेला : महानगरपालिकेच्या क्षेत्रात लसीकरण केंद्रावर पहिला व दुसरा डोस घेणारे नागरिक येत असल्याने लसीकरण केंद्रावर गोंधळाची परिस्थिती निर्माण होत आहे. त्यामुळे लसीकरणामध्ये सुसूत्रता येण्यासाठी प्रथम व दुसरा टोल येणाऱ्या नागरिकांची स्वतंत्रपणे व्यवस्था करावी अशी मागणी भाजपा प्रवक्ता नगरसेवक गिरीश जोशी यांनी केली आहे.

महानगरपालिका आयुक्त श्रीमती अरोरा व महापौर अर्चना मसने यांना एका निवेदनाद्वारे ही मागणी केली असून लसीकरणासाठी ज्येष्ठ नागरिकांना त्रास होणार नाही या संदर्भात दक्षता घेण्याचेही नमूद केले आहे.

.......................................

लसीकरणासाठी युवकांनी सज्ज व्हावे

अकाेला : अठरा वर्षे वरील सर्वांना काेराेना लसीकरणासाठी बुधवार २८ एप्रिल रोजी नोंदणी सुरू होत आहे. युवकांनी नोंदणी करून लसीकरणासाठी सज्ज व्हावे असे आवाहन केंद्रीय राज्यमंत्री संजय धाेत्रे यांनी केले आहे. ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांना केंद्रावर जाता यावे यासाठी लसीकरण नोंदणी मोठ्या प्रमाणावर करावी असे त्यांनी म्हटले आहे.

.....................................

Web Title: Hanuman Jayanti Bhandara paid for the children

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.