गारपीटग्रस्तांच्या याद्यांमध्ये तफIवत
By admin | Published: July 3, 2014 10:42 PM2014-07-03T22:42:37+5:302014-07-04T00:44:45+5:30
गारपीटग्रस्तांच्या याद्यांमध्ये घोळ असल्याचे दिसत आहे.
लोहगड: मार्च महिन्यात झालेल्या गारपिटीने तालुक्यातील रब्बी पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकर्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान होऊन त्यांच्यावर आत्महत्या करण्याची पाळी आली असताना गारपीटग्रस्तांच्या याद्यांमध्ये घोळ असल्याचे दिसत आहे. तहसील प्रशासनाने प्रसिद्धीसाठी दिलेल्या लाभार्थींच्या याद्या व बँकेला पाठविण्यात आलेल्या याद्यांमध्ये मोठी तफावत असल्याची माहिती मिळाली आहे.
मार्च महिन्यात झालेल्या गारपिटीने तालुक्यातील रब्बी पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले होते. शासनस्तरावर या पीक नुकसानीची दखल घेण्यात आली आणि गारपीटग्रस्त भागांचा सर्व्हे करून नुकसानग्रस्तांना आर्थिक मदतही देण्यात आली; परंतु या पीक नुकसानीच्या सर्व्हेत पक्षपात झाल्याच्या तक्रारी करण्यात आल्या, तसेच नुकसानग्रस्तांच्या याद्यातही घोळ असल्याची माहिती मिळाली आहे.
गारपिटीने झालेल्या पीक नुकसानीपोटी लोहगड येथील एका महिला शेतकर्याला ३0 हजार रुपये नुकसान भरपाई देण्याऐवजी ३0 हजार अधिक २४ हजार, असे ५४ हजार रुपये देण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.
काही लोकांना या संदर्भात कळल्यानंतर आपले कारनामे उघड होऊ नये म्हणून संबंधित कर्मचार्यांनी त्या महिलेस मिळालेली अधिक रक्कम परत करण्याची सूचना के ली, तसेच रक्कम त्वरित परत करण्यासंदर्भात धमक्याही देण्यात आल्या; परंतु ही चूक तहसील प्रशासनाचीच असल्याने त्या महिला शेतकर्याने कोणत्याही सूचनेला आणि धमकीलाही भीक घातले नाही.
हळदोली येथील नुकसानग्रस्तांच्या याद्यांमध्येही प्रचंड घोळ झाला असून, ग्रामपंचायतकडे पाठविण्यात आलेल्या लाभार्थींच्या याद्या व बँकेला पाठविण्यात आलेल्या याद्यांमध्ये तफावत असल्याची तक्रार शेतकर्यांनी तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली असून, ग्रामपंचायतीला दिलेल्या लाभार्थींच्या यादीनुसारच बँकेच्या खात्यामध्ये रक्कम जमा करावी अन्यथा साखळी उपोषण करण्यात येईल, असा इशाराही त्यामधून देण्यात आला आहे. दरम्यान, हळदोली येथील बँकेच्या लाभार्थी यादीमध्ये हळदोन शिवारात शेत नसलेल्या एका शेतकर्याच्या नावे तब्बल ५0 हजार रुपयांची रक्कम जमा करण्यात आली आहे. शेतकर्यांनी या संदर्भातही तहसीलदारांना तोंडी माहिती दिली. शिवसेनेचे तालुकाप्रमुख किशोर पाटील, भाजपचे तालुकाध्यक्ष गणेश झळके, कोथळी बु.चे माजी सरपंच सुपाजी शिंदे, भाजप क ार्यकर्ते सुनील जानोरक र, जांभरूण येथील भीमराव शिंदे नंदकि शोर कळसकर यांच्यासह अनेक जण निवेदन देतेवेळी उपस्थित होते.