मराठा आरक्षण वैध ठरल्याचा आनंदोत्सव!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2019 01:40 PM2019-06-28T13:40:02+5:302019-06-28T13:40:07+5:30
मराठा आरक्षण मिळाल्याबद्दल शहरात आतषबाजी करू न आणि मिठाईचे वाटप करू न आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायधीश रणजित मोरे यांनी गुरुवारी मराठा समाजाला शिक्षणात १२ टक्के व नोकरीत १३ टक्के आरक्षण जाहीर केले. मराठा आरक्षण मिळाल्याबद्दल शहरात आतषबाजी करू न आणि मिठाईचे वाटप करू न आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
मराठा आरक्षणाकरिता मराठा समाजातील ४२ तरुणांनी बलिदान केले. मराठा क्रांती मूक मोर्चाने प्रत्येक मराठा बांधव जागृत झाला. अनेक मराठा संघटनांनी मोठ्या प्रमाणात आंदोलन उभारू न वेळोवेळी संघर्ष केला. जवळपास चौदा हजारांच्यावर आंदोलकांवर गुन्हे दाखल केले. त्यापूर्वी औरंगाबाद येथून भय्यूजी महाराज यांच्या प्रेरणेने मराठा आरक्षणाची ज्योत पेटली होती. भय्यूजी महाराज यांच्या प्रेरणेने औरंगाबाद येथून मराठा आरक्षणाची ज्योती पेटली होती. मराठा आरक्षणाच्या लढ्यात शहीद झालेल्या तरुणांना आणि कोपरडी येथील तरुणीला आज आरक्षण मिळाल्यामुळे खऱ्या अर्थाने श्रद्धांजली ठरली आहे. राज्यातील मराठा समाजातील रस्त्यावर उतरलेल्या प्रत्येक घटकाला न्याय मिळाला आहे, अशा यावेळी मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
मराठा आरक्षण मिळाल्याबद्दल शहरात शिवाजी पार्क येथे तरुणाईने फटाके फोडून व मिठाईचे वाटप करू न आनंदोत्सव साजरा केला. अखिल भारतीय सह्यांद्री मराठा संघटना संस्थापक अध्यक्ष डॉ. मकरंद पाटोळे, प्रदेशाध्यक्ष डॉ. काशीनाथ पटेकर, जिल्हाध्यक्ष अमन पाटील, अनिल कानगुडे, जय देशमुख, अविनाश देशमुख, छत्रपती पाटोळे, अमोल गुंजाळ, शुभम पाटोळे, वैभव पाटोळे, नितीन मोरे, अक्षय नलावडे, गजानन देव, प्रमोद बरडे, आकाश पावले, रोहित देशमुख, भय्यू देशमुख, गीतेश सोने, राजेश पवार, दिनेश देव व संग्राम मोहिते या आंनदोत्सवात सहभागी झाले होते.
मराठा क्रांती मोर्चातील कार्यकर्त्यांनी बसस्थानक चौकात सायंकाळी भगवे ध्वज उंचावले. आतषबाजी आणि नागरिकांना मिठाईचे वाटप करू न आनंदोत्सव साजरा केला. ‘एक मराठा-लाख मराठा’, अशा घोषणांनी आसमंत दुमदुमले. यावेळी डॉ. अभय पाटील, युवराज गावंडे, चंद्रकांत झटाले, सागर कावरे, रामभाऊ वाघमोडे, अविनाश पवार, मनोहर हरणे यांच्यासह शेकडो मराठा समाज बांधव उपस्थित होते.