हॅपी वुमन्सने दिला निराधार महिलांना आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:25 AM2021-09-16T04:25:13+5:302021-09-16T04:25:13+5:30

मूर्तिजापूर : येथील ज्ञान नर्मदा बहुद्देशीय संस्थेद्वारा संचालित विष्णू लोडम यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या सामाजिक कार्यात अग्रेसर हॅपी वुमन्स ...

Happy Women supports homeless women | हॅपी वुमन्सने दिला निराधार महिलांना आधार

हॅपी वुमन्सने दिला निराधार महिलांना आधार

Next

मूर्तिजापूर : येथील ज्ञान नर्मदा बहुद्देशीय संस्थेद्वारा संचालित विष्णू लोडम यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या सामाजिक कार्यात अग्रेसर हॅपी वुमन्स क्लबद्वारा जुनी वस्ती येथील नगर परिषद घरकुल सामाजिक सभागृह सेंटर क्रमांक एक येथील निराधार महिला आधारगृह येथे महिलांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. यामध्ये गहू, तांदूळ, तूरडाळ, साखर इत्यादी जीवनावश्यक वस्तूंचा समावेश होता.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. यावेळी अमिता तिडके, सुनीता लोडम, दीपाली देशमुख, अनिता गावंडे, जया टाले, राजकन्या खणखने, मनीषा यादव, आधारगृह अधीक्षिका छाया डोंगरे, नर्मदा प्रजापती, अश्विनकुमार कनोजे, क्षमा इंगळे, कल्पना तिडके, सोनल बांगड, माला जाजू, भाग्यश्री मुळे, पल्लवी मुळे, वैशाली पवार, आधारगृहातील लाभार्थी इत्यादींची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी हॅपी वुमन्स क्लबच्या सदस्यांनी परिश्रम घेतले. विष्णू लोडम यांनी आभार मानले.

Web Title: Happy Women supports homeless women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.