हॅपी वुमन्सची आढावा बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:25 AM2020-12-30T04:25:32+5:302020-12-30T04:25:32+5:30
मूर्तिजापूर : ज्ञाननर्मदा बहुउद्देशीय संस्थेद्वारे संचालित हॅपी वुमन्स क्लबची आढावा बैठक प्रतिभावंत नगर हॅपी किड्स स्कूल येथे पार पडली. ...
मूर्तिजापूर : ज्ञाननर्मदा बहुउद्देशीय संस्थेद्वारे संचालित हॅपी वुमन्स क्लबची आढावा बैठक प्रतिभावंत नगर हॅपी किड्स स्कूल येथे पार पडली.
महिलांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्याच्या दृष्टीने संस्थापक विष्णू लोडम यांच्या संकल्पनेतून उपक्रम राबविण्यात येत आहेत. हॅपी वुमन्स क्लबद्वारे राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजनाबाबत चर्चा व नियोजन करण्यात आले. जिजामाता पूजनानंतर मान्यवर महिलांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोनल बांगड हाेत्या. यावेळी डॉ. शिवानी देशमुख, सुषमा कावरे उपस्थित होत्या. यावेळी महिलांच्या सशक्तीकरणासाठी अमिता तिडके यांनी मार्गदर्शन केले. या प्रसंगी आयोजित काव्य मैफलीमध्ये विविध क्षेत्रांतून आलेल्या महिलांनी काव्य सादरीकरण केले. महिला सशक्तीकरणासाठी हॅपी वुमन्स क्लब करीत असलेले कार्य प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन सोनल बांगड यांनी अध्यक्षीय भाषणात केले.
कार्यक्रमासाठी कल्पना तिडके, सुनीता लोडम, दीपाली देशमुख, भाग्यश्री मुळे, रंजना सदार, पल्लवी मुळे, मयूरी कडू, विभुती लोडम यांनी परिश्रम घेतले.