'हापूस आंबा'ही घरपोच मिळणार !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2020 04:38 PM2020-05-03T16:38:08+5:302020-05-03T16:38:15+5:30
७ मे पासून रत्नागिरीचा जगप्रसिद्ध हापुस आंबा देखील घरपोच उपलब्ध करून देण्यात येणार आहे .
अकोला : कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग नियंत्रित करण्यासाठी लागू असलेल्या ' लॉक डाऊन' च्या कालावधीत जिल्'ातील नागरिकांना सहकारी संस्थांमार्फत जीवनावश्यक वस्तू घरपोच उपलब्ध करून देण्याचा उपक्रम सहकार विभागाच्या जिल्हा उपनिबंधक कार्यालयामार्फत राबविण्यात येत आहे. त्यामध्ये आता गुरुवार , ७ मे पासून रत्नागिरीचा जगप्रसिद्ध हापुस आंबा देखील घरपोच उपलब्ध करून देण्यात येणार आहे .
जिल्'ातील नागरिकांना किराणा , भाजीपाला , फळं इत्यादी जीवनावश्यक वस्तू सहकारी संस्थांमार्फत घरपोच उपलब्ध करून देण्याचा उपक्रम सहकार विभागामार्फत जिल्हा उपनिबंधक कार्यालयाद्वारे राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत ७ मे पासून जिल्'ातील नागरिकांना रत्नागिरीचा जगप्रसिद्ध हापूस आंबा घरपोच उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी सहकार विभागामार्फत जिल्'ात नेमण्यात आलेल्या विक्री केंद्रांकडे ग्राहकांनी हापूस आंब्याची मागणी नोंदविण्याचे आवाहन जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था ) डॉ. प्रवीण लोखंडे यांनी केले आहे.