हापूसचा दर कोरोना निर्बंधांनंतरही कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:18 AM2021-04-24T04:18:52+5:302021-04-24T04:18:52+5:30
अकोला : जागतिक दर्जा असलेल्या देवगड हापूस आंब्याचा दर कोरोना निर्बधांनंतरही कायम आहे. सध्या एक डझन आंब्याची पेटी ११०० ...
अकोला : जागतिक दर्जा असलेल्या देवगड हापूस आंब्याचा दर कोरोना निर्बधांनंतरही कायम आहे. सध्या एक डझन आंब्याची पेटी ११०० ते १२०० हजार रुपयाला विक्री होत आहे. संचारबंदीमध्ये आवक कमी असली तरी ग्राहकांकडून मागणी सुरू आहे.
----------------------------------------------
वृक्षलागवड अभियान अडचणीत
अकोला : दरवर्षी वन विभागाच्यावतीने जिल्ह्यात वृक्ष लागवड अभियान राबविण्यात येत असते; मात्र यावर्षी कोरोनाचे संकट मोठे झाले असल्याने वृक्षलागवड अभियान अडचणीत येण्याची शक्यता आहे. मागील वर्षी कोरोनामुळे अभियान राबविण्यास अडचणी आल्या होत्या.
----------------------------------------------
२३ हजार मे. टन खत साठा शिल्लक
अकोला : खरीप हंगामाची गरज लक्षात घेता कृषी विभागाने खताचे नियोजन केले आहे. मागील हंगामातील २३ हजार १०३ मेट्रिक टन खत साठा शिल्लक असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले आहे. पुढील काळात आणखी खत साठा जिल्ह्यात येणार आहे.
------------------------------------------------
शासकीय कार्यालयात १५ टक्के उपस्थिती
अकोला : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व शासकीय कार्यालय १५ टक्के उपस्थितीसह सुरू ठेवण्याचे आदेश आहे. त्यानुसार शुक्रवारी जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयात केवळ १५ टक्के कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती; मात्र कमी कर्मचारी उपस्थित असल्याने यंत्रणेवर ताण आला आहे.
--------------------------------------------------
ढेपेच्या भावात वाढ!
अकोला : सरकीसोबत आता ढेपेचे भाव वाढले आहेत. मागील वर्षी दोन हजार रुपयांत मिळणारी ढेप आता २ हजार ७५० रुपये प्रति क्विंटल मिळत आहे. त्यामुळे पशुपालकांचे आर्थिक गणित बिघडले आहे. ढेपेच्या भावात तेजी कायम राहण्याचा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.