साेशल मीडियावर महिलांचा छळ, सायबरकडे ३२ तक्रारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:19 AM2021-07-29T04:19:32+5:302021-07-29T04:19:32+5:30

सायबर सेलकडे आलेल्या तक्रारी २०१८ २०१९ २०२० २०२१ जुलै ०५ ०६ १२ ...

Harassment of women on social media, 32 complaints to cyber | साेशल मीडियावर महिलांचा छळ, सायबरकडे ३२ तक्रारी

साेशल मीडियावर महिलांचा छळ, सायबरकडे ३२ तक्रारी

Next

सायबर सेलकडे आलेल्या तक्रारी

२०१८ २०१९ २०२० २०२१ जुलै

०५ ०६ १२ ०९

कुठल्या प्रकारचा छळ

घाणेरडे अश्लील मेसेज पाठविणे

सांकेतिक चिन्ह पाठविणे

अश्लील व्हिडीओ, छायाचित्र पाठविणे

शरीर साैंदर्याची स्तुती करणे

अश्लील भाषेत चाट करणे

नि:संकोचपणे पोलिसांकडे करा तक्रार

सोशल मीडियाद्वारे जर कोणी अज्ञात व्यक्ती आपल्याला अश्लील मेसेजद्वारे छळत असेल तर त्याबाबतची तक्रार जवळच्या पोलीस ठाण्यात नि:संकोचपणे करावी. अन्यथा पोलीस नियंत्रण कक्षाला कळवून थेट ‘निर्भया’ पथकाची मदत घ्यावी, असे आवाहन अपर पाेलीस अधीक्षक माेनिका राऊत यांनी केले आहे. पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर संभाव्य व्यक्तीकडून गुन्हेगारी प्रवृत्तीची कृती होण्यापूर्वीच ती रोखता येणे शक्य होईल, असे त्यांनी सांगितले,

---

तक्रार न करणाऱ्यांची संख्याही अधिक

सोशल मीडियावरून अश्लीलतेला बळी पडलेल्या सर्वच महिला, युवतींकडून पोलिसांकडे तक्रार केली जाते असे नाही. तर बहुतांश महिलांकडून परस्पररित्या अकाऊंट बदलून किंवा संबंधित व्यक्तीला ब्लॉक, अनफ्रेन्ड वगैरे करूनदेखील वेळ मारून नेली जाते. दरम्यान, अशा तक्रारी न करणाऱ्या महिलांची संख्या अधिक असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Web Title: Harassment of women on social media, 32 complaints to cyber

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.