हरभरा घोटाळा : ८0 केंद्र संचालकांची सुनावणी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2017 02:09 AM2017-10-12T02:09:11+5:302017-10-12T02:09:15+5:30
अकोला : हरभरा बियाणे घोटाळ्य़ात नोटीस बजावलेल्या १४0 पैकी ८0 कृषी केंद्र संचालकांच्या सुनावण्या बुधवारपर्यंत आटोपल्याची माहिती जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी एच.जी.ममदे यांनी दिली. याप्रकरणी घोटाळेबाजांवर तातडीने कारवाई होण्यासाठी उर्वरित संचालकांनी सुनावणी जलदगतीने पूर्ण करण्याची मागणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख, जिल्हा परिषद सदस्य नितीन देशमुख यांनी कृषी विकास अधिकार्यांच्या भेटीदरम्यान केली.
लोकमत न्यूज नेटवर्क

गेल्या वर्षीच्या रब्बी हंगामात राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानांतर्गत हरभरा बियाणे अनुदानावर देण्यात आले.
त्याचा लाभ पात्र शेतकर्यांना न मिळता ते महाबीजचे वितरक, दलालांनी मध्येच लाटला. त्यासाठी बोगस शेतकर्यांच्या नावे ते वाटप झाल्याचे पुरावेही गोळा केले. तेच पुरावे प्रतिज्ञापत्रावर लेखी स्वरूपात घेत जिल्हा परिषदेच्या कृषी अधिकार्यांना सादर केले जात आहेत. विशेष म्हणजे, शासनाच्या कृषी विभागाच्या सहायकांपासून ते उप-संचालक स्तरापर्यंतच्या अधिकार्यांनी केलेल्या चौकशीत त्या शेतकर्यांनी बियाणे घेतले नसल्याचे सांगितले. आता त्यापैकी अनेक शेतकर्यांचे प्रतिज्ञापत्र घेऊन त्यांनी उचल केल्याचा बनाव अनेक कृषी केंद्र संचालकांनी केला आहे.
त्यामुळे तो आधार घेत केंद्र संचालकांना वाचवण्याचा घाट घातला जाऊ शकतो, याची माहिती घेण्यासाठी बुधवारी देशमुख यांनी कृषी विकास अधिकारी ममदे यांच्याकडे धाव घेतली. हरभरा घोटाळ्य़ातील संबंधितांची सुनावणी याच गतीने सुरू राहिल्यास ती वर्षभरही पूर्ण होणार नाही. तसे झाल्यास कारवाई कधी होणार, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. सुनावणी जलद गतीने पूर्ण करून तत्काळ कारवाई करण्याची मागणी देशमुख यांनी रेटली.