'एसपी' विशेष पथकाचे प्रमूख हर्षराज अळसपुरे यांना आंतरीक सुरक्षा सेवापदक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2018 04:13 PM2018-05-14T16:13:12+5:302018-05-14T16:13:12+5:30
अकोला - जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्या विशेष पथकाचे प्रमूख तथा साहायक पोलीस निरीक्षक हर्षराज अळसपुरे यांनी २०११ ते २०१४ या कालावधीत गडचिरोली जिल्हयात उल्लेखनीय कामगीरी केल्याबद्दल त्यांना केंद्र शासनाच्या गृहविभागाव्दारे आंतरीक सेवा पदक जाहीर करण्यात आले आहे.
गडचिरोली व चंद्रपुर या जिल्हयातील नक्शलवाद परिसरात उल्लेखनीय कामगीरी करणाऱ्या पोलिसांना केंद्र शासनाच्या गृहविभागाकडून आंतरीक सुरक्षा सेवापदक देण्यात येते. अकोला पोलिस दलातील साहायक पोलीस निरीक्षक हर्षराज अळसपुरे यांनी २०११ ते २०१४ या कालावधीत गडचिरोली जिल्हयातील ग्यारापत्ती या प्रचंड नक्शलवादी असलेल्या पोलिस मदत कें द्रामध्ये तब्बल तीन वर्ष उल्लेखनीय कामगीरी केली. त्यामूळे त्यांना राज्य शासनाकडूनही पदक मिळाले असून आता केंद्र शासनाच्या गृह खात्याकडून आंतरीक सेवा सुरक्षपदक त्यांना जाहीर झाले आहे. विशेष पथकाचे कारभार चालविणारे अळसपुरे २००९ च्या बॅचचे पोलीस उपनिरीक्षक असून त्यांनी सुरुवातीला गडचिरोली त्यानंतर मुंबई व अलीबाग येथे यशस्वीरीत्या कामकाज केले आहे. तर आता अकोला जिल्हयात गत एक वर्षापासून ते विशेष पथकाचे प्रमूच असून त्यांनी धुरा सांभाळल्यापासून अवैध धंदेवाल्यांना सडो की पळो करून सोडले आहे. हर्षराज अळसपुरे यांना केंद्र शासनाकडून आंतरीक सुरक्षा सेवापदक मिळाल्याने त्यांच्या कारकीर्दीत आणखी एक यशाचा तुरा खोवल्या गेला आहे.