हटीया-पुणे व मालदा टाउन-सुरत विशेष रेल्वे गाड्या धावणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2021 07:35 PM2021-02-02T19:35:56+5:302021-02-02T19:37:45+5:30
Hatia - Pune and Malda Town - Surat special trains या दोन्ही गाड्या अकोला स्थानकावरून जाणार असल्याने अकोलेकरांची सोय झाली आहे.
अकोला : मिशन बिगीन अंतर्गत रेल्वेची प्रवासी वाहतुक हळूहळू सुरळीत होत असताना प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वेने ५ व ६ फेब्रुवारीपासून हटीया - पुणे व मालदा टाउन -सुरत या आणखी दोन विशेष रेल्वे गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. अनुक्रमे आठवड्यातून दोन वेळा व साप्ताहिक असलेल्या या दोन्ही गाड्या अकोला स्थानकावरून जाणार असल्याने अकोलेकरांची सोय झाली आहे.
हटीया - पुणे
गाडी क्रमांक- ०२८४९ अप हटिया-पुणे विशेष गाडी ५ फेब्रुवारीपासून पुढील आदेशापर्यंत दर शुक्रवार व सोमवारी हटिया स्थानकावरून रात्री ०८.०५ वाजता रवाना होईल आणि तिसऱ्या दिवशी पुणे स्टेशनला दुपारी ०२.४५ वाजता पोहचेल. ही गाडी अकोला स्थानकावर दर शनिवार व मंगळवारी दुपारी ०२.४२ वाजता येऊन ०२.४५ वाजता पुढील प्रवासासाठी रवाना होईल.
गाडी क्रमांक ०२८५० डाऊन पुणे -हटिया विशेष गाडी दिनांक ७ फेब्रुवारीपासून पुढील आदेशापर्यंत दर रविवार व बुधवारला पुणे स्थानकावरून सकाळी १०.४५ वाजता रवाना होईल आणि दुसऱ्या दिवशी हटिया स्टेशनला दुपारी १६.२५ वाजता पोहचेल. ही गाडी अकोला स्थानकावर दर सोमवार व गुरुवारी रात्री ९.४७ वाजता येऊन ९.५० वाजता पुढील प्रवासासाठी रवाना होईल.
मालदा टाउन -सुरत
गाडी क्रमांक-०३४२५ अप मालदाटाउन -सुरत विशेष गाडी ६ फेब्रुवारीपासून पुढील आदेशापर्यंत दर शनिवारी मालदा टाउन स्थानकावरून दुपारी १२.३० वाजता रवाना होईल आणि तिसऱ्या दिवशी सुरतला पहाटे ०४.०० वाजता पोहचेल. ही गाडी रविवारी सायंकाळी ७.१० वाजता अकोला स्थानकावर येऊन ७.१५ वाजता पुढील प्रवासाठी रवाना होईल.
गाडी क्रमांक- ०३४२६ डाऊन सुरत-मालदा टाउन विशेष गाडी ८ फेब्रुवारीपासून पुढील आदेशापर्यंत दर सोमवारी सुरतहुन दुपारी ०२.२० वाजता रवाना होईल आणि तिसऱ्या दिवशी मालदा टाउनला सकाळी ०६.१५ वाजता पोहचेल. ही गाडी रात्री ८.३८ वाजता अकोला स्थानकावर येऊन २०.४