मुख्याध्यापक,शिक्षकांसह विद्यार्थ्याना हुक्का पार्लरमध्ये पकडले !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2017 01:54 PM2017-09-10T13:54:29+5:302017-09-10T13:59:59+5:30
अकोला - पातुर रोडवरील अमनदीप ढाब्यावर अवैधरीत्या सुरु असलेल्या ‘हुक्का पार्लर’वर जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्या विशेष पथकाचे प्रमूख हर्षराज अळसपुरे यांनी शनिवारी मध्यरात्री छापा टाकला. यावेळी हुक्का पार्लरमध्ये असलेल्या १० मुख्याध्यापक, शिक्षक, १० विद्यार्थी व ढाबा मालकास अटक करण्यात आली आहे. राज्यातील ही सर्वात मोठी कारवाई असल्याची माहिती असून अकोल्याच्या इतीहासात अशा प्रकारे पहील्यांदाच कारवाई करण्यात आली आहे.
पातुर रोडवरील नावाजलेल्या अमनदीप ढाब्यावर मोठया प्रमाणात अवैधधंदे चालत असून बेकायदेशीररीत्या ‘हुक्का पार्लर’चालविण्यात येत असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्या विशेष पथकाचे प्रमूख हर्षराज अळसपुरे यांना मिळाली. त्यांनी पथकासह शनिवारी मध्यरात्री गंगा नगर येथील रहिवासी मोहम्मद मुख्तबीर शेख बशीर याच्या मालकीच्या अमनदीप ढाब्यावर छापेमारी केली. या छापेमारीत १० मुख्याध्यापक व शिक्षकांसह १० विद्यार्थी व ढाबा मालकास अटक करण्यात आली. यामध्ये शिक्षक सहकारी पतसंस्था मर्या. अकोलाचा संचालक संजय इंगळेचा समावेश आहे. त्यांच्याकडून एक लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यासोबतच हुक्का पार्लरसाठी वापरण्यात येत असलेली मोठी साधन सामग्री ताब्यात घेण्यात आली असून महागडे ‘ड्रग्स’ही जप्त केल्याची माहिती आहे. हुक्का पार्लरवर अकोला पोलिसांच्या इतीहासात प्रथमच ही कारवाई करण्यात आली असून पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांच्या मार्गदर्शनात विशेष पथकाचे प्रमूख हर्षराज अळसपुरे यांनी ही धडाकेबाज कारवाई केली. या कारवाईत पातुर पंचायत समितीतंर्गत असलेल्या जिल्हा परिषद शाळांचे शिक्षक व मुख्याध्यापक असून सिंधी कॅम्पमधील १० विद्यार्थी सहभागी आहेत. या २१ जनांना अटक करून त्यांची वैद्यकीय चाचणी करण्यात आली आहे. या २१ आरोपींवर विविध कलमान्वये
गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वैद्यकीय चाचणीत ड्रग्स घेतल्याचे उघड
१० मुख्याध्यापक शिक्षक आणि १० विद्यार्थ्यांसह २० आरोपींची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. यामध्ये बहुतांश शिक्षक, मुख्याध्यापक व विद्यार्थ्यांनी ड्रग्स घेतल्याचे अहवालात स्पष्ट झाले आहे. तर काही मुख्याध्यापक शिक्षक व विद्यार्थ्यांनी यथेच्छ मद्यप्राशनासह अन्य अंमली पदार्थ सेवन केल्याचेही अहवालात नमुद आहे. त्यामूळे या मुख्याध्यापक शिक्षकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.
या शिक्षक, मुख्याध्यापकांचा समावेश
शिक्षक वय व्यवसाय राहणार
महेश सिताराम मानकरी ३९ शिक्षक गाडगेवाडी पातुर
दिनेश आत्मारात केकन ४० शिक्षक रामनगर पातुर
संतोष तेजसिंह राठोड ४३ शिक्षक रामनगर पातूर
विजय पांडुरंग भुतकर ३८ शिक्षक गाडगेवाडी पातूर
सुनील ज्ञानदेव गवळी ३६ शिक्षक शिक्षक कॉलनी पातुर
गोपीकृष्ण राजाराम ऐनकर ५१ शिक्षक रेणुका नगर पातूर
सुखदेव रामजी शिंदे ४० शिक्षक शिवनगर पातुर
अनील नामदेव दाते ४४ शिक्षक रंगारहट्टी पातुर
संजय देवराव इंगळे ४३ शिक्षक बाळापुर वेस पातुर
धिरन नंदु यादव ३२ शिक्षक चिखलगाव
या विद्यार्थ्यांचा समावेश
सिंधी कॅम्पमधील कच्ची खोली येथील रहिवासी गीरीष गोपालदास वलेजा (१९), अमीत मुरलीधर गुरनानी (१८), भरत विजयकुमार हेमनानी (१९), कमल सुनीलकुमार वलेजा (१८), शशांक रमेश चावला (१८),सागर भामर पंजवानी (१८),राहुल विजय दुर्गीया (२०),राहुल मनोजकुमार राजपाल (१८), पत्रकार कॉलनीतील देवेश दिलीपकुमार खेमानी (१८), निशांत गोपान चंदवानी (१९) या १० विद्यार्थ्यांचा समावेश आहे. हे विद्यार्थी व वरील शिक्षक नियमीत हुक्का पार्लरवर जात असल्याची माहिती उघड झाली आहे.