महाराष्ट्र पशुधन विकास मंडळाचे मुख्यालय अकोल्यातून नागपूरला स्थलांतरित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:33 AM2021-02-06T04:33:20+5:302021-02-06T04:33:20+5:30
पशुधन विकास मंडळाचे मुख्यालय अकोल्यात आवश्यक पश्चिम विदर्भातील आर्थिक मागासलेपण लक्षात घेता ज्या उद्देशाने या स्वायत्त संस्थेची स्थापना झालेली ...
पशुधन विकास मंडळाचे मुख्यालय अकोल्यात आवश्यक
पश्चिम विदर्भातील आर्थिक मागासलेपण लक्षात घेता ज्या उद्देशाने या स्वायत्त संस्थेची स्थापना झालेली आहे, त्या उद्देशाच्या पूर्ततेसाठी हे मुख्यालय अकोल्यात असणे गरजेचे आहे. अकोल्यात कृषी विद्यापीठ तसेच पशु वैद्यकीय विज्ञान अभ्यासक्रमाच्या पदवी व पदव्युत्तर महाविद्यालय असल्याने शेतकऱ्यांना कृषी आणि पशुधन विषयक सोयी-सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध होऊ शकतात. त्या दृष्टिकोनातून पशुधन विकास मंडळाचे कार्यालय अकोला येथेच कायम ठेवणे गरजेचे आहे.
मुख्यमंत्र्यांना निवेदन
पशुधन विकास मंडळाच्या कार्यालयाची प्रशासकीय इमारत तसेच आयुक्तांच्या निवासस्थानाच्या बांधकामासाठी अकोला जिल्हा नियोजन समितीमार्फत सन २०१९-२० मध्ये ६.१० कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात आले हाेते. या बांधकामाचे अंदाजपत्रक तयार करून नजीकच्या काळात बांधकाम पूर्ण करणेसुद्धा शक्य आहे. ही बाब लक्षात घेता महाराष्ट्र पशुधन विकास मंडळाचे मुख्यालय अकोला येथून नागपूर येथे स्थलांतरित करण्यात येऊ नये, अशा मागणीचे निवेदन यापूर्वी स्थानिक लोकप्रतिनीधींनी मुख्यमंत्र्यांना दिले होते.