निलंबित अधिकाऱ्याचे मुख्यालय चौथ्यांदा बदलले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2019 02:52 PM2019-02-13T14:52:41+5:302019-02-13T14:52:45+5:30
अकोला : निलंबित केल्यानंतर १५ महिन्यांच्या कालावधीत तब्बल चार वेळा मुख्यालय बदलण्यासोबतच तब्बल दहा महिने निर्वाह भत्ता न देता झुलवत ठेवण्यात आले.
अकोला : निलंबित केल्यानंतर १५ महिन्यांच्या कालावधीत तब्बल चार वेळा मुख्यालय बदलण्यासोबतच तब्बल दहा महिने निर्वाह भत्ता न देता झुलवत ठेवण्यात आले. हा प्रकार पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीराम कुलकर्णी यांनी मानसिक त्रास देण्यासाठी केला आहे. त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी निलंबित विस्तार अधिकारी आर. के. देशमुख यांनी मुख्य कार्यकारी अधिकाºयांना निवेदनातून केली आहे.
पंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाºयांना सातत्याने मुख्य कार्यकारी अधिकाºयांची दिशाभूल केली. लाचलुचपत विभागाने दाखल केलेल्या एफआयआरमध्ये नमूद मुद्यांना बाजूला ठेवत काढलेला निलंबनाचा आदेशच चुकीचा आहे. त्याआधारे पदस्थापनेसाठी चुकीचे आदेश काढण्यात आले. २६ सप्टेंबर २०१७ रोजी केलेल्या निलंबनाच्या आदेशात मुख्यालय अकोट पंचायत समिती देण्यात आले. त्यानंतर १५ दिवसातच म्हणजे, ९ आॅक्टोबर रोजी मुख्यालय बदलण्याचा आदेश देत ते तेल्हारा पंचायत समिती करण्यात आले. तेल्हारा येथे त्यांचे वेतन व भत्ते निघणार नसल्याने पुन्हा १७ सप्टेंबर २०१८ रोजी त्यांची पदस्थापना बदलून अकोला पंचायत समिती करण्यात आली. त्यानंतर १० जानेवारी २०१९ रोजी त्यांचे मुख्यालय बाळापूर पंचायत समिती करण्यात आले. निलंबनाच्या तब्बल १५ महिन्यांच्या काळात चार वेळा मुख्यालय बदलण्याचा विक्रम पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी कुळकर्णी यांनी केला. त्यातही कहर म्हणजे, विस्तार अधिकारी देशमुख यांना दहा महिने निर्वाह भत्ताही देण्यात आला नाही. निर्वाह भत्ता काढता येणार नाही, अशा ठिकाणी सातत्याने पदस्थापना देत देशमुख यांचा मानसिक छळ करण्यात आला. हा प्रकार हेकेखोर व नियमबाह्यपणे करून अन्याय करणाºया उपमुख्य कार्यकारी अधिकारी कुळकर्णी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी देशमुख यांनी शासनाला पाठवलेल्या निवेदनात केली आहे.