आरोग्य केंद्रे, वसतिगृहांची तपासणी!
By admin | Published: March 15, 2017 02:42 AM2017-03-15T02:42:49+5:302017-03-15T02:42:49+5:30
वर्धा येथे बलात्कार करणार्या आरोपीस खदान पोलिसांनी मोठय़ा शिताफीने मंगळवारी अटक केली.
अकोला, दि. १४- खदान परिसरातील जेतवन नगर येथील रहिवासी एका अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन तिच्यावर शेगाव व वर्धा येथे बलात्कार करणार्या आरोपीस खदान पोलिसांनी मोठय़ा शिताफीने मंगळवारी अटक केली. त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आले असून, न्यायालयाने आरोपीस पोलीस कोठडी सुनावली.
जेतवन नगरातील रहिवासी एका कुटुंबीयांकडे त्यांची नातेवाईक मुलगी राहायला आली होती. या ठिकाणी त्यांच्या घराचे बांधकाम सुरू असताना जेतवन नगर परिसरातीलच रहिवासी अजय ऊर्फ मायकल किशोर मेश्राम हा तिथे सेंट्रिंगचे काम करण्यासाठी यायचा. काम करीत असतानाच त्याने अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळय़ात ओढून तिला शेगाव येथे नेले. या ठिकाणी सदर अल्पवयीन मुलीवर ९ जानेवारी रोजी बलात्कार केला. त्यानंतर पुन्हा वर्धा येथे घेऊन जाऊन त्याने मुलीवर पुन्हा बलात्कार केला. मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार तिच्या नातेवाइकांनी खदान पोलीस स्टेशनमध्ये दिल्यानंतर पोलिसांनी अजय मेश्राम याच्याविरुद्ध १२ जानेवारी रोजी भारतीय दंड विधानाच्या कलम ३६३ आणि ३६६ नुसार गुन्हा दाखल केला. त्यानंतर खदानचे ठाणेदार गजानन शेळके यांनी मुलीचा शोध घेऊन तिला मुलाच्या तावडीतून सोडून आणले.
विश्वासात घेऊन चौकशी केल्यानंतर मुलीने तिच्यावर सतत झालेल्या बलात्काराची आपबिती पोलिसांसमोर कथन केली. त्यानंतर अजय मेश्राम याच्याविरुद्ध कलम ३७६ नुसार बलात्काराचा गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला. मंगळवारी सदर आरोपीस अटक करण्यात आली. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपीस पोलीस कोठडी सुनावली. ही कारवाई खदानचे ठाणेदार गजानन शेळके यांच्या मार्गदर्शनात साहायक पोलीस निरीक्षक आर. भारसाकळे, पीएसआय अस्लम खान व कर्मचार्यांनी केली.