कीटकनाशकाची फवारणी करणाऱ्या शेतकरी व शेतमजुरांची आरोग्य तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2020 11:03 AM2020-08-19T11:03:36+5:302020-08-19T11:05:02+5:30

राज्यात केवळ अकोल्यातच हा उपक्रम चालविला जात असल्याचा दावा कृषी विभागाने केला आहे.

Health check up of farmers and farm laborers spraying pesticides | कीटकनाशकाची फवारणी करणाऱ्या शेतकरी व शेतमजुरांची आरोग्य तपासणी

कीटकनाशकाची फवारणी करणाऱ्या शेतकरी व शेतमजुरांची आरोग्य तपासणी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : पिकांवर कीटकनाशकाची फवारणी करताना विषबाधेच्या घटनांना आळा घालण्यासाठी फवारणी करणाºया शेतकरी व शेतमजुरांची आरोग्य तपासणी करण्याची विशेष मोहीम अकोला जिल्ह्यात १६ ते २४ आॅगस्ट या कालावधीत कृषी व आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येत आहे.
पिकांवर कीटकनाशकाची फवारणी करताना शेतकरी व शेतमजुरांना विषबाधा होण्याच्या घटना गतवर्षी अकोला जिल्ह्यात घडल्या होत्या. या पृष्ठभूमीवर यंदा जिल्ह्यात पिकांवर कीटकनाशकाची फवारणी करताना, विषबाधेच्या घटना घडू नयेत, यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून कीटकनाशकाची फवारणी करणाºया शेतकरी व शेतमजुरांची आरोग्य तपासणी करण्याची विशेष मोहीम १६ ते २४ आॅगस्ट या कालावधीत जिल्हा परिषद कृषी व आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येत आहे. त्यामध्ये जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमार्फत विशेष शिबिरे घेऊन, कीटकनाशक फवारणीचे काम करणाºया शेतकरी व शेतमजुरांची आरोग्य तपासणी केली जात आहे. राज्यात केवळ अकोल्यातच हा उपक्रम चालविला जात असल्याचा दावा कृषी विभागाने केला आहे.


जिल्ह्यात पिकांवर कीटकनाशकाची फवारणी करताना विषबाधेच्या घटना घडू नयेत, यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यात कीटकनाशकाच्या फवारणीचे काम करणाºया शेतकरी व शेतमजुरांची आरोग्य तपासणी करण्याची विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.
- डॉ. मुरली इंगळे
कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद, अकोला.

Web Title: Health check up of farmers and farm laborers spraying pesticides

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.