‘स्वच्छता से सिद्धी’ पंधरवड्यात स्वच्छतेचा जागर; आरोग्य विभागाचा उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2018 03:09 PM2018-04-02T15:09:42+5:302018-04-02T15:09:42+5:30
अकोला : लोकांमध्ये आरोग्यदायी सवयी व स्वच्छतेची आवड निर्माण होऊन स्वच्छता ही जीवनशैली बनावी या उद्देशाने केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार १ ते १५ एप्रिल दरम्यान ‘स्वच्छता से सिद्धी’ हा पंधरवडा साजरा करण्यात येत असून, आरोग्य विभागामार्फत या पंधरवड्यात ग्रामीण व आरोग्य केंद्र स्तरावर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

१ तारखेला आरोग्य संस्थांच्या ठिकाणी पंधरवड्याचे उद्घाटन स्वच्छतेची शपथ घेण्यात आली. २ ते ९ तारखे दरम्यान गावांमध्ये श्रमदान, आरोग्य संस्थास्तरावर रुग्णांमध्ये जनजागृती निर्माण होण्याच्या दृष्टीने प्रात्यक्षिक, नुक्कड नाटक व लोक कला कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. ७ एप्रिल हा जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा करण्यात येतो. त्यामध्ये आरोग्यदायी प्रवृत्ती, आरोग्यदायी सवयी व आरोग्यदायी जीवनशैली या घटकांवर आधारित उपक्रमांद्वारे जागतिक आरोग्य दिन साजरा करण्यात येणार आहे. १० एप्रिल रोजी स्वच्छता उपक्रम राबविताना येणारे अनुभव, आव्हाने व नवनवीन कल्पना याबाबत आदान-प्रदान करण्यात येणार आहे. ११ ते १४ एप्रिल दरम्यान आरोग्य संस्थास्तरावर व सामाजिकस्तर या दोन स्तरावर उपक्रम राबविण्यात येणार आहे. आरोग्यसंस्थास्तरावर स्वच्छतेचे आॅडीट, स्वच्छ कार्यालय, स्वच्छ वार्ड स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. तसेच रक्तदान, अवयवदान व आरोग्य शिबीरांचेही आयोजन करण्यात आले आहे. सामाजिक स्तरावर हगणदारीमुक्त गाव, स्वच्छ शाळा, स्वच्छ अंगणवाडी, कचऱ्याचे व्यवस्थापन, वैयक्ति स्वच्छता आदी उपक्रम राबविण्यात येणार आहेत. १५ एप्रिल रोजी संपूर्ण अभियानातील अनुभव व आव्हाने याबाबत ग्रामसभेच्या माध्यमातून गावकºयांना माहिती देण्यात येणार आहे. सदर अभियान यशस्वी करण्यासाठी ग्रामस्थांनी सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एम.एम. राठोड यांनी केले आहे.