समुपदाय आरोग्य अधिकाऱ्यांची २१ जुलैला राज्यभरात परीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2019 01:15 PM2019-07-20T13:15:25+5:302019-07-20T13:15:39+5:30
अकोला: राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत आरोग्यवर्धिनी कार्यक्रमासाठी निवडल्या जाणाºया समुपदाय आरोग्य अधिकाऱ्यांची निवड होत असून, त्यासाठी २१ जुलै रोजी राज्यभरात एकाच वेळी परीक्षा होत आहेत.
अकोला: राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत आरोग्यवर्धिनी कार्यक्रमासाठी निवडल्या जाणाºया समुपदाय आरोग्य अधिकाऱ्यांची निवड होत असून, त्यासाठी २१ जुलै रोजी राज्यभरात एकाच वेळी परीक्षा होत आहेत.
२१ जुलै रोजी सकाळी ११ ते १ वाजेपर्यंत ही परीक्षा होणार असून, त्यातून निवडल्या जाणाºयांना आरोग्यवर्धिनी कार्यक्रमात सहभागी करून घेतले जाणार आहे. आरोग्य उपसंचालक परिमंडळाच्या अख्त्यारीत ही परीक्षा होत आहे. राज्यातील ठाणे, रायगड, पालघर, लातूर, नांदेड, उस्मानाबाद, पुणे, सातारा,सांगली, सिंधुदुर्ग, अहमदनगर,जळगाव, नाशिक ,नंदूरबार,अमरावती, यवतमाळ, नागपूर, भंडारा, वर्धा, गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर या जिल्ह्याच्या ठिकाणी परीक्षा केंद्र घोषित झाले आहेत. जिल्ह्या ठिकाणचे महाविद्यालयांची या केंद्रांसाठी निवड करण्यात आली आहे. सोबतच परीक्षार्थी समुपदाय आरोग्य अधिकाºयांना ओळखपत्र पाठविण्यात आले आहेत. परीक्षेचा निकाल आरोग्य अधिकाºयांना त्यांच्या व्यक्तीगत मेल अॅड्रेसवर पाठविला जाणार आहे. अधिक माहितीसाठी आरोग्य विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर संपर्क साधावा, असे आवाहन राज्य आरोग्य सोसायटीच्यावतीने करण्यात आले आहे.