बोरगाव वैराळे येथे आरोग्य पथक दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2017 12:50 AM2017-09-30T00:50:16+5:302017-09-30T00:50:22+5:30
बोरगाव वैराळे : घटसर्प या रोगाची लागण झाल्याने बोरगाव वैराळे येथील पाच गुरे दगावली होती. याविषयी ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करताच बाळापूर पंचायत समितीचे पशुवैद्यकीय अधिकारी पी. एस. वाघाडे हे बोरगाव वैराळे गावात २९ सप्टेंबर रोजी दाखल झाले. त्यांनी आजारी असलेल्या गुरांची तपासणी करून तातडीने लसीकरण केले.
लोकमत न्यूज नेटवर्क

बाळापूर पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या बोरगाव वैराळे येथील मनोज बोक्से, राजकुमार गावंडे, सदानंद गावंडे, नीलेश महल्ले, महेश डोंगरे यांची महागडी पाच गुरे २८ सप्टंेबर रोजी घटसर्प या रोगाची लागण झाल्यामुळे दगावली होती. त्यामुळे पशुपालक संकटात सापडले होते. याविषयी ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केले होते.
या वृत्ताची दखल घेत बाळापूर तालुका पशुवैद्यकीय अधिकारी आर. बी. मेहत्रे व अंदुरा येथील पशुवैद्यकीय अधिकारी पी. एस. वाघाडे यांनी भेट देऊन गावातील अनेक गुरांना लसीकरण केले व आजारी असलेल्या गुरांची तपासणीदेखील यावेळी करण्यात येऊन उपचार करण्यात आला.
बोरगाव वैराळे येथील काही गुरांना आजार प्रतिबंधक लसीकरण कार्यक्रम राबविण्याच्या सूचना देण्यात आला असून, गुरांचे लसीकरण पशुपालकांनी करून घेणे गरजेचे आहे. शासन पशूंसाठी दरवर्षी लसीकरणाचे कार्यक्रम राबवत असते; परंतु पशुपालन या बाबतीत सकारात्मक नसल्यामुळे शासनाच्या योजना यशस्वी होत नाहीत.
- आर. बी. मेहत्रे,
तालुका पशुधन विकास अधिकारी.